आपल्यापैकी अनेक जण बाहेरचे पदार्थ खात असतात. आपण बाहेर गेल्यावर किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर हॉटेलमध्ये मोठ्या आवडीने वेगवेगळे पदार्थ खात असतो. आपण हा विचार करतो की आपण दररोज तरी पदार्थ खात नाही तर आज खायला काय हरकत आहे, असं म्हणत आपण महिन्यातून तीन ते चार वेळा अशा गोष्टी खात असतो.
असे करणे आपल्या शरीराला खरोखरच फायदा देत नाही तर उलट शरीराचे नुकसान करतात. आपल्या नकळत या सगळ्या गोष्टी होत असतात. हे पदार्थ जरी आपल्या चवीला स्वादिष्ट लागत असले तरी यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. बहुतेक वेळा चमचमीत, मसालेदार, तेलकट, मैदायुक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या पोटाचे आरोग्य बिघडते. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खरोखर नुकसान होऊ शकते.
सर्वात पहिले बेकरी प्रोडक्स म्हणजे बेकरीत या गोष्टी बिस्किट टोस्ट यासारख्या गोष्टींमध्ये चार प्रकारचे वाईट पोईजन म्हणजेच विषारी घटक असतात. जसे की मैदा, साखर, हायड्रोजनिटीक तूप आणि मीठ. सोबतच मैदा खाल्ल्याने आपले वजन दुप्पट जास्त वाढू सोबतच दुधाच्या पदार्थांमध्येही कोलेस्टेरॉल असते. चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असलेले आहार हृ’दय’विकाराचा धोका वाढवतात. दुसरी गोष्ट म्हणजे लोणचे.
लोणच्याचे अनेक प्रकारे दुष्परिणाम आपल्या शरीराला होत असतात. आपल्या नकळत आपल्या शरीरातील आम्ल वाढत असते. लोणच्याचा जास्त वापर केल्याने आपल्या पोटातील आम्लता वाढते. तसेच त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अॅसिडिटी, गॅस, करपट ढेकर येणे सारख्या समस्याना समोर जवे लागू शकते. मसाले आणि तेल याप्रमाणेच लोणच्यात मिठाचे प्रमाणही जास्तच असते.
त्यामुळे चविष्ठ लागणारे हे लोणचे आपल्या आरोग्यासाठी मात्र अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते. त्यानंतर मॅगी, पास्ता अशा प्रकारचे सेवन रोज केल्याने आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढू शकते आणि र’क्तातील साखरेच्या प्रमाणात कमी जास्त होऊ शकते. आणि लगातार एक वर्ष खाल्याने डायबिटीज देखील होऊ शकतो. त्यासोबतच कॉ’न्स्टि’पेशन देखील होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त भाज्यांचा वापर केला पाहिजे.
त्यासोबतच सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक आज-काल जीवनामध्ये आपण दररोज सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडाच सेवन करत असतो.त्यात हानिकारक रसायने देखील असतात. त्यांच्यातील साखरेचे उच्च प्रमाण, बहुतेकदा उच्च-फ्रुक्टोज कॉर्न सिरप, मधुमेहास कारणीभूत ठरू शकते आणि हृदयवर परिणाम करू शकते. फॉस्फोरिक ऍसिड सारख्या संरक्षकांमुळे हाडांची झीज होऊ शकते आणि मू’त्र’पिं’डाचे आजार आणि सायट्रिक ऍसिडमुळे दातांची तीव्र झीज होऊ शकते.
त्यानंतर बंद बॉक्स मधील ज्यूस. कधी आपण विचार केला आहे का जर आपण अस्तित्वात बनविलेला ज्युस काही तासांमध्ये खराब होऊ शकतो तर सहा महिन्यांपर्यंत हा बंद करून ठेवलेला ज्युस कसा काय एवढे दिवस राहू शकतो तर यामध्ये भरपूर प्रमाणात असेंस आणि पल्पचा वापर करून हा ज्यूस बनविलेला असतो त्याचबरोबर यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्याचे सेवन केल्यामुळे आपले वजन देखील वाढू शकते आणि आपला हृ’दय’विकार देखील होऊ शकतो.
सोबतच डायबिटीस चे प्रमाण देखील वाढू शकते सोबतच रंग वापरून बनवलेले पदार्थ हे पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात त्यामुळे आपले वजन देखील वाढू शकते सोबत असुदे विकाराची देखील शक्यता येऊ शकते. कारण आपण आज काय सगळीकडेच रंग वापरून बनवलेले पदार्थ पाहतो जसे की केक,आईस क्रीम वेगवेगळे ड्रिंक्स त्यामुळे या सगळ्याचा वापर करणे कमी केले पाहिजे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.