आज आपण जाणून घेणार आहोत पाणी पिण्यासाठीचा योग्य प्रकार. आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे पाणी पीत असतात. याचाच अर्थ आपल्यापैकी काही जण फिल्टर वॉटर म्हणजेच बाहेरून विकत घेऊन पाणी पीत असतात. तर काहीजण घरामध्ये फिल्टर लावून त्याचे पाणी पीत असतात. तर काहीजण त्यापेक्षाही महाग पाणी पीत असतात.
त्यामुळे आपल्याला वाटत असते की आपण योग्य पाणी पीत आहोत किंवा योग्य प्रकारे पाणी पीत आहोत पण खरोखरच आपण असणारे पाणी आपल्या शरीरासाठी योग्य आहे का? किंवा आपले पाणी पिण्याचा प्रकार बरोबर आहे का? आज आपण याच संदर्भातील काही गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की पाणी कधीही फ्रेश प्यावे.
याचाच अर्थ ते फ्रोजन म्हणजेच फ्रीज मध्ये ठेवून त्याचा साठा फ्रीज मधला असु नये कारण फ्रीज हा भाज्या ताज्या ठेवण्यासाठी किंवा कोणताही पदार्थ ताजा ठेवण्यासाठी असतो. पाणी स्वतःमध्येच ताजे असते ते कधीच शिळे होत नाही. हे पाणी प्यायल्यास त्याचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम दिसून येतो. त्यामुळे माडक्यातले किंवा साधे निर्मळ पाणी प्यावे.
त्याचबरोबर अनेकदा आपण खूप जणांकडून हे ऐकतो सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्यास ते आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायी असते म्हणजेच जास्त गरम पाणी किंवा जास्त थंड पाणी पिऊ नये तर कोमट म्हणजेच हलके गरम पाणी प्यावे. दररोज सकाळी हे पाणी प्यायल्यास दिवसाची सुरुवात चांगली होते आणि आपला दिवस देखील चांगला जातो त्याचबरोबर गरम पाणी प्यायल्यास आपले पोट साफ राहण्यास मदत होते.
त्याच बरोबर सकाळी आपल्या तोंडामध्ये असलेली लाळग्रंथी मधून एकत्र झालेले लाळ आपल्या पोटामध्ये जाणे गरजेचे असते त्यामुळे सकाळी सर्वप्रथम आपण पाणी प्यायल्यास हि लाळ आपल्या पोटात जाते. याचा सर्वात पहिला आणि मोठा फायदा आपल्या शरीरासाठी हा होतो की आपले वजन कमी होण्यास मदत होते. आज-काल सर्वांचेच वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले दिसून येते.
बाहेरचे खाल्ल्यामुळे जंक फूड खाल्ल्यामुळे वजनामध्ये बरीच वाढ होते आणि ते कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना डायबिटीज असेल तर त्यांना देखील हा उपाय करणे अत्यंत लाभदायी ठरेल कारण डॉक्टर आपल्याला सांगतात की, ज्यांना डायबिटीज आहे त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील.
पण जर जर दररोज सकाळी उठल्यानंतर दोन ते तीन ग्लास पाणी प्यायल्याने तुमचा डायबिटीस समान पातळीवर येईल आणि दोन ते तीन महिन्यात तुम्हाला गोळ्या देखील घ्याव्या लागणार नाहीत. सकाळची लाळ जर चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा चेहऱ्यावरील फोडांवर लावल्यास चेहरा नितळ आणि साफ होण्यास मदत होईल. त्याचबरोबर डोळ्याखालील डार्क सर्कल देखील निघून जातील सोबतच केस गळती थांबेल आणि केस वाढण्यास मदत होईल.
अशा प्रकारचे अनेक फायदे तुमच्या शरीराला आणि तुमच्या त्वचेला देखील होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.