कधी कधी काही कारणांमुळे आपली त्वचा काळपट होऊ लागते सोबतच आपले पाय आपल्या हातांची त्वचा थोडी थोडी काळी होऊ लागते त्यासाठी आपण पेडीक्युअर, मेनिक्युअर देखील करत असतो पण त्वचा कायम स्वरूपासाठी गोरी होत नाही म्हणूनच आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यामुळे हात पाय यांची त्याच्या नैसर्गिक रूपात गोरी करता येईल.
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातील रोजच्या वापरातील काही गोष्टी लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला कोण कोणत्या घरगुती गोष्टी लागणार आहेत. सर्वप्रथम आपल्याला बेसन पीठ घ्यायचे आहे. बेसन पीठ त्वचा उजळ बनविण्यासाठी चे काम करते सोबतच आपल्या त्वचेतील डेड स्किन निघून जायला देखील बेसनामुळे फायदा होतो.
आपण अनेकदा घरी देखील बेसन मध्ये दूध टाकून किंवा हळद टाकून आपल्या चेहऱ्याला लावत असतो आणि त्यानंतर आपल्या शरीरांवर एक वेगळीच चमक येते आपला चेहरा अधिक उजळ बनतो कारण बेसन पीठ आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. म्हणून इथे आपल्याला बेसनाचा वापर करायचा आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे बेसन घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला लिंबाचा वापर करायचा आहे.
लिंबाचा वापर देखील चेहरासाठी केल्यास चेहऱ्यावर चमक येतेच त्याचबरोबर इथं नाच्रल ग्लो देखील येतो जर आपली त्वचा काळपट पडली असेल तर ते लाईटन होण्यास मदत होते. म्हणूनच आपल्याला एका लिंबाचा वापर करायचा आहे. त्यानंतर यामध्ये मिठाचा वापर देखील करायचा आहे. मिठामुळे आपली डेट स्किन कायमची निघून जाते आणि जर आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडल्या असतील तर त्या देखील निघून जायला मदत होते.
जर आपल्या त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ते देखील बरे व्हायला मदत होते. त्यानंतर झाड आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे. दहीमध्ये देखील असे गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा मुलायम राहायला मदत होते सोबतच लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे त्वचा गोरी होण्याचे देखील मदत होते म्हणजेच उजळ होते. सोबतच आपल्याला हळदीचा वापर देखील करायचा आहे.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपली त्वचा नैसर्गिक रित्या गोरी होण्यासाठी मदत होते. म्हणून इथे आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला रोजच्या वापरातील हळद वापरायचे असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता किंवा चेहऱ्यासाठी तुम्ही कस्तुरी हळद वापरत असाल तर तुम्ही त्या हळदीचा देखील वापर करू शकता. आता घरगुती उपाय बनविण्याची प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत.
त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये दोन चमचे बेसन घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे आहे. मीठ टाकल्यामुळे आपल्या पायांना आराम मिळणार आहे. त्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन थेंब खोबऱ्याचे तेल टाकणार आहोत म्हणजेच नारळाचे तेल टाकणार आहोत, जेणेकरून आपली त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होणार आहे.
त्यानंतर दोन चमचे दही या मध्ये टाकायचे आहे आणि हे संपूर्ण मिश्रणाला एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला एक बारीक पेस्ट तयार करून मिळणार आहे. जर यामध्ये तुम्हाला दही अजून लागणार असेल तर तुम्ही अजून दही देखील वापरू शकता. सोबतच आपल्याला एक चमचा लिंबाचा रस देखील टाकायचा आहे. लिंबामध्ये नॅचरल ब्लीच असते आणि त्यामुळे आपली त्वचा अधिक का होण्यास मदत होते म्हणून आपल्याला लिंबाचा वापर करायचा आहे.
त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायचे आहे आणि आता त्या मिश्रणाला एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. आता एकत्रित करून घेतलेल्या मिश्रणाला आपल्या पायांवर आणि हातांवर व्यवस्थित लावून घ्यायचे आहे लावून झाल्यानंतर सर्वप्रथम हलक्या हाताने यावर मसाज देखील करायचे आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे हातांवर तसेच राहू द्यायचे आहे. जेणेकरून या उपायांमध्ये वापरले गेलेले सर्व औषधी गुणधर्म आपल्या त्वचेवर हळूहळू काम करायला लागतील.
दहा ते पंधरा मिनिटानंतर आपली त्वचा थंड किंवा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. या उपायाच्या एकाच वापराने तुम्हाला भरपूर फरक झालेला दिसून येईल. सोबतच यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे घरगुती असल्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम किंवा हानीकारक परिणाम होणार नाही. उलट यामुळे फायदाच होणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.