उन्हाळ्यात भूक न लागणे.! जेवण न पचणे.! सर्व समस्या या एका उपायाने गायब होतील.!

आरोग्य

आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्या सर्वांनाच अनेक समस्यांना किंवा अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते. गरमीत अचानकपणे भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर दिवसान दिवस पडत असतो आणि त्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला भूक लागत नाही किंवा गॅस सारखी समस्या निर्माण होते.

आपल्याला आपले पोट दिवसभर भरलेले वाटते त्यामुळे आपले खाण्याचे प्रमाण उन्हाळ्यामध्ये कमी होते, अशावेळी अशक्तपणा आपल्या शरीरातील आजार वाढतात. त्यावर अनेक औषधोपचार करावे लागतात. त्यामुळे आज आपण जो उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे असे आजार होणार नाहीत आणि गरमीमध्ये देखील आपल्याला भूक लागेल. त्याचबरोबर सर्व पोटाचे आजार दूर होतील.

चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोणकोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे. इथे आपल्याला काळी मिरीचा वापर दाण्यांमध्ये न करता तो पावडर च्या रूपात करायचा आहे. ही पावडर बाजारामध्ये देखील उपलब्ध होऊ शकते पण जर तुम्हाला बाजारामध्ये मिळणारी पावडर वापरायची नसेल तर काळी मिरीची पावडर आपण घर बसल्या देखील बनवू शकतो.

त्यामुळे काळी मिरी चा वापर एक चमचा करायचा आहे. पावडर बनविण्यासाठी काळीमिरी मिक्सर मध्ये घालुन त्यांची बारीक पावडर बनवुन घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे धने. धने देखील आपल्याला पावडर स्वरूपातच घ्यायचे आहेत. जर तुमच्याजवळ धने नसतील किंवा धना पावडर नसेल तर बाजारपेठेमध्ये धना पावडर देखील उपलब्ध होऊन जाईल.

हे वाचा:   या एका उपायाने शुगरचे सर्व रिपोर्ट नॉर्मल येतील, असा घरगुती रामबाण जो करेल त्याला होईल फायदाच फायदा.!

जर नसेल तर तुम्हाला हवे असेल तर मिक्सरमध्ये टाकून तुम्ही त्याची पावडर बनवून तयार करू शकता. त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायचे आहे ती म्हणजे वेलची आपल्या घरगुती उपायांमध्ये आपण वेलची देखील वापरू शकतो पण त्यापेक्षाही जास्त फायदेशीर वेलची तेव्हा ठरते किंवा जेवणानंतर आपण दोन वेलच्या खाल्ल्या तरी त्या देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.

त्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्यामुळे आपल्याला वेलची ची वापर करायचा आहे. आता एका वाटीमध्ये बनवलेल्या पदार्थांची पावडर अर्धा अर्धा चमचा घेऊन एकत्रितपणे मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून या मिश्रणाला एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. असं बनवून झालेला पदार्थ चाटण खातो त्या प्रकारे आपल्याला सेवन करायचे आहे.

जेणेकरून आपल्याला भूक देखील लागेल आणि आपले खाल्लेले अन्न पचायला देखील मदत होईल. त्यामुळे नंतर आपल्याला या मिश्रणाचे सेवन करायचे आहे. त्याचप्रमाणे याचे सेवन दररोज केल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशन अपचन यासारख्या गोष्टी होणार नाहीत. त्यानंतर या उपायांबरोबरच आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे बडीशेप.

हे वाचा:   या डाळीचे पीठ चेहऱ्याला एकदम गोरेपान बनवते, ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची गरज राहणार नाही.!

बडीशेप खाल्ल्याने जेवण पचायला मदत होते. जेवण डायजेस्ट होते त्याचबरोबर आपले शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. आता या बडीशेप मध्ये आपल्याला अशी एक गोष्ट वापरायचे आहे ज्यामुळे ही खाल्ल्यानंतर आपल्याला भूक लागण्यास देखील मदत होणार आहे. लिंबाच्या रसामध्ये एक ते दोन चमचे बडीशेप टाकून रात्रभर भिजत ठेवायची आहे.

सकाळी उठल्यानंतर ही भिजलेली बडीशेप सुकत ठेवायची आहे आणि सुकवून घेतल्यावर या बडीशेपचे सेवन जेवणानंतर करायचे आहे. जेवढा फायदा आपल्याला पहिल्या उपायाने होणार आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा देखील जास्त फायदा आपल्याला या दुसऱ्या उपायाने देखील होणार आहे. हे दोन्ही उपाय घरगुती आणि रोजच्या वापरातील पदार्थांनी बनवलेले असल्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणताही हानिकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *