कोलगेटचा असाही वापर केला जाऊ शकतो.! अनेकांना नाही माहिती, मुलींनी नक्की वाचावे.!

आरोग्य

आपल्या दातांना मजबूत करण्यासाठी, दातांना स्वच्छ ठेवण्यासाठी टूथपेस्टचा वापर आपण करत असतो. त्याव्यतिरिक्त दातामध्ये कॅविटी होऊ नये, दात कायम साफ राहावेत, दात स्वच्छ रहावेत व दात शुभ्र राहावेत म्हणून आपण टूथपेस्टचा वापर करत असतो पण याशिवाय देखील आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला टूथपेस्टचा फायदे होऊ शकतो आणि हेच फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

त्यातला सर्वात पहिला फायदा म्हणजे कधी कधी आपल्या हाताची बोटांची नखे काही कारणास्तव पिवळी होऊ लागतात अशावेळी आपल्या नखांवर टूथपेस्ट लावून पाच ते दहा मिनिटांसाठी नखे एखाद्या ब्रश ने घासल्यास टूथपेस्ट मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे आपली नखे शुभ्र होतात. आपल्या नखांवर जो पिवळा थर जमा झालेला असतो तो कायमचा निघून जातो त्यानंतर जर आपला चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील आणि ते जात नसतील आणि आपल्याला अचानक कुठेतरी बाहेर जायचे झाले तर त्यावेळी आपण टूथपेस्ट च्या मदती ने पिंपल्स नष्ट करू शकतो.

त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक जणांना अजून ही वहीमध्ये लिहायला आवडत असेल अशावेळी आपण काही लिहत असून तर पेनाने लिहिलेले सहजा सहज पुसले जात नाही अशावेळी आपण जिथे चूक झाली आहे तिथे टूथपेस्ट लावून आपण लिहिलेले नष्ट करू शकतो. हा देखील एक टूथपेस्टचा फायदा आहे सोबतच आपण घरी केक बनवत असू आणि आपल्याला केक वर नक्षीकाम करण्यासाठी कोण नसेल तर केक वर लावण्याची क्रीम आपण खाली झालेल्या टूथ पेस्ट च्या कंटेनरला धुवून त्यामध्ये टाकून क्रीमच्या कोण सारखा वापर करू शकतो.

हे वाचा:   फक्त दोन मिनिटांमध्ये दात मोत्यासारखे चमकू लागेल.! फक्त दोन मिनिटात पिवळे पडलेले दात होतील पांढरेशुभ्र.!

म्हणजे त्यासाठी आपल्याला महाग गोष्टी घेण्याची देखील गरज भासणार नाही. जर आपल्या घरामध्ये लहान मुले असतील तर आपल्या सर्वांनाच माहीत असेल की आपल्या भिंती कशाप्रकारे लहान मुले खराब करत असतात म्हणजेच पेनाचा वापर करून त्या भिंतीवर लिहिणे हे आपल्या सर्वांच्याच घरात होत असेल यावेळी आपण अनेकदा भिंती साफ करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्या भिंती हव्या तशा साफ होत नाही पण त्यावर आपण पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट लावून व त्या डागांवर ही पेस्ट घासून भिंतीवरचे डाग कायमचे नष्ट करू शकतो.

जर आपण दररोज काम करत असू तर आपल्याला स्ट्रेस म्हणजेच ताण निर्माण होत असेल आणि हा ताण घालवण्यासाठी आपण अनेकदा म्हणजेच आपल्यापैकी अनेक जण स्ट्रेस बस्टरचा वापर करत असू आणि तो विकत घेण्यासाठी आपल्याला पैसे लागत असतील तर त्यासाठी आपण एखादा रिकामी फुगा घेऊन त्यामध्ये टूथपेस्ट टाकून त्याला गाठ मारून त्याचा वापर आपण स्ट्रेस बस्टर सारखा करू शकतो. हा अगदी शुल्लक पैशांमध्ये तयार होणारा स्ट्रेस बस्टर आपण घरबसल्या तयार करू शकतो.

आपल्यापैकी काही जण मांसाहारी असतील तर त्यांना माहीत असेल जेव्हा आपण मासे साफ करतो तेव्हा आपल्या हाताला एका वेगळ्या प्रकारचा वास येतो आणि तो वास नष्ट करण्यासाठी टूथपेस्टचा वापर आपण करू शकतो. जसे आपण हँडवॉश लावून आपले हात साफ करत असतो त्याच प्रकारे आपण हात टूथपेस्ट धुतले तर त्याचा वास आणि चिकटपणा निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर थम्सअप मध्ये थोडीशी टूथपेस्ट टाकून त्याचा स्प्रे आपण बेसिंगवर बाथरूम मध्ये वापर करून ही जागा स्वच्छ करू शकतो.

हे वाचा:   मेंदूचे ऑपरेशन कसे केले जाते माहिती आहे का.? आज जाणून घ्या काय असते नेमके मेंदूचे ऑपरेशन.!

त्याचबरोबर चष्मा किंवा कोणतीही काच किंवा मोबाईलचा कॅमेरा आणि मोबाईलची स्क्रीन यावर पडलेले स्क्रॅच आणि धूळ हे सर्व साफ करण्यासाठी आपण टूथपेस्ट चा वापर करू शकतो आणि हा वापर केल्यावर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळतो त्यामुळे आपला बाहेर जाऊन काच साफ करण्याचा खर्च देखील वाचतो त्याचबरोबर कधीकधी आपण इस्त्री करताना कोणता तरी कपडा जाळतो आणि तो जाळल्या नंतर इस्त्रीवर डाग राहतो.

हा डाग काही केल्या निघत नाही अशावेळी कोणत्यातरी कपड्यावर किंवा भांडी घासण्याच्या काथ्यावर थोडीशी टूथपेस्ट घेऊन घासल्याने इस्त्रीवरील डाग निघून जातील. आपले ओठ कधी कधी फुटलेले असतात, थंडीमध्ये ड्राय होतात अशावेळी आपण त्यावर टूथपेस्ट लावली तर ते परत एकदा ओठ मुलायम होऊ शकतात. आपल्या नाकावर डाग स्पॉट्स अचानक आलेले असतात. हे डार्क स्पॉट्स देखील आपण टूथपेस्टच्या सहाय्याने नाहीसे करू शकतो.

अशाप्रकारे टूथपेस्टचे अनेक फायदे आपल्याला होत असतात. आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला टूथपेस्ट चे फायदे अनुभवायला मिळतील त्यामुळे आता यापुढे आपला जो अधिकचा खर्च अनेकदा होतो तो खर्च देखील वाचेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.