जेवणानंतर लगेच करपट ढेकर येणे, भयंकर अपचन होणे होईल शून्य मिनिटात बंद.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना अपचन,गॅस ही समस्या होत असते. हा त्रास वारंवार होऊन अनेकांना पित्त, गॅस, अपचनची सवय होऊन जाते. अनेकदा आपण जे काही अन्न पदार्थ सेवन करतो ते चावून खाल्ले की लाळेतील विकरांची प्रक्रिया होणे सोपे होते. हे अन्न अन्ननलिकेद्वारा जठरात, नंतर लहान आतड्यात व तेथून मोठ्या आतड्यात जाते. निरनिराळ्या भागांत निरनिराळे विकर अन्नावर प्रक्रिया करतात व अन्नातील निरनिराळ्या घटकांचे पचन व शोषण होते.

या सामान्यपणे चालणार्‍या प्रक्रियेत व्यत्यय आला तर अपचन होते त्यासोबतच ऍसिडिटी देखील आपल्याला होत असते आणि ऍसिडिटी होण्यामागे अनेक कारणे असतात. सतत जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाणे, तेलकट पदार्थ खाणे, अनियमित जेवणाच्या सवयी, जेवण्याच्या अनियमित वेळा, जागरण, मानसिक ताण -तणाव, सततची काळजी व चिंता, सततची घाई, गडबड या कारणांमुळे ऍसिडिटी होऊ शकते.

तसेच धू’म्रपान, म’द्यपान, तं’बाखू सेवन यामुळे सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. अनेकजण सोडा पितात. ऍसिडिटी निघून जाण्याचे बाजारात उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टी देखील आपण घेतो पण त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास काही मुळापासून बरा होत नाही. हा गॅस जास्त प्रमाणात झाल्यामुळे आपल्याला डोकेदुखी देखील होते .आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे ऍसिडिटी, अपचन हे सर्व आजार कायमचे दूर होतील त्यासाठी आपल्याला घरातील काही गोष्टी लागणार आहेत.

हे वाचा:   या आयुर्वेदिक वनस्पती ला गवत समजण्याची चूक करू नका, लाखो रुपये वाचवणारी वनस्पती आहे.!

चला तर मग जाणून घेऊया आपल्याला कोण कोणत्या घरगुती गोष्टी लागणार आहेत आणि हा घरगुती उपाय कशाप्रकारे बनवायचा आहे. सर्वप्रथम हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला लागणार आहे धने. धने हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. धने हे व्हिटॅमिन के, सी आणि ए सारख्या जीवनसत्त्वांनी समृद्ध असल्याचे देखील मानले जाते त्याचबरोबर अपचनावर जालीम असा उपाय म्हणजे धने.

अपचनासाठी अनेकदा जिरे उपयुक्त ठरते म्हणून आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा जिरे देखील घ्यायचे आहे सोबतच एक चमचा बडीशेप देखील आपल्याला वापरायची आहे. स्वादिष्ट चवी शिवाय बडीशेप खाण्याचे इतर ही अनेक फायदे आहेत. तज्ञांच्या मते, बडीशेप हे असे एक सुपरफूड आहे,जे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यात मदत होते.

त्यानंतर हा उपाय करण्यासाठी अजून एक गोष्ट आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे वेलची. वेलची देखील आपल्याला खायची सवय नसेल तर ही सवय लावून घायला हवी. वेलची देखील खाणे आपल्याला चालू करायचे आहे कारण वेलची ही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदात वेलची उष्ण पदार्थ मानली जाते, जी शरीराला उबदारपणा देते. जर तुम्हाला सतत ऍसिडिटी त्रास होत असेल तर वेलची उपायकारक आहे.

त्यामुळे आपल्याला दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि आता सर्व गोष्टी मिक्स करून ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायच्या आहेत. आपण या गोष्टी पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवणार आहोत कारण त्यामुळे या गोष्टींमध्ये असणारे औषधी गुणधर्म या पाण्यामध्ये येथील आणि हे पाणी आपल्या शरीरासाठी अजून फायदेशीर आणि अजून गुणकारी ठरेल आणि या पाण्यामुळे आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळतील.

हे वाचा:   नागीण माणसाच्या शरीरावर कशी वेढा टाकते.! नागीण झाल्यावर काय करावे आणि काय करू नये.! खूप महत्वाची माहिती आहे कोणीही सांगणार नाही.!

सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि सर्वप्रथम यामध्ये टाकलेल्या दोन वेलची आपल्याला चावून चावून खायच्या आहेत आणि त्यानंतर गाळून घेतलेले पाणी आपल्याला सकाळी उपाशी पोटी प्यायचे आहे. या उपायाचा वापर दररोज केल्यामुळे आपल्या ऍसिडिटी चे प्रमाण खूप कमी होईल. हळूहळू गॅस समस्या नष्ट व्हायला लागेल त्याचबरोबर पोट साफ राहण्यास देखील मदत होईल. गॅसचे प्रमाण देखील कमी होईल.

सतत येणारे ढेकर ते देखील कमी होतील आणि आपल्याला या सगळ्याचा जास्त फायदा होईल. हा उपाय आपण घरामध्ये सहज फारसा खर्च न करता करू शकतो आणि याचे सेवन दररोज करू शकतो त्यामुळे आपल्याला अधिक कोणताही जास्त खर्च होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.