वयाच्या 80 वर्षापर्यंत कणभर सुद्धा कॅल्शियम कमी होणार नाही.! म्हातारपण एकदम आरामात घालवायचे असेल तर एकदा हा लेख वाचायलाच हवा.!

आरोग्य

आपले शरीर सुदृढ असावे असे प्रत्येकाला वाटत असते पण आजकालच्या बदलत्या जगामध्ये आपले राहणीमान आपले खानपान बदलत आहे त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टी खाताना विचार करत नाही आणि त्यामुळे आपल्याला हवे ते पोषक तत्त्वे मिळत नाहीत त्यापैकी एक म्हणजे कॅल्शिअम. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये पुरेसे कॅल्शियम मिळत नाही तोपर्यंत आपण हेल्दी राहत नाही तर आपल्या शरीरात ताकद येत नाही.

थोडेसे चालल्यावर आपल्याला दमायला होते म्हणजे आपल्याला थकवा येतो. फक्त वृद्ध लोकांना नाही तर आजकालच्या तरुण पिढीमध्ये देखील हा आणि असा झालेला बदल दिसून येतो, त्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेक औषधे वापरतो आणि त्याने देखील आपल्या शरीरावर कोणताही फरक दिसून येत नाही. कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे आपल्या हाडांचे दुखणे जसे की गुडघे दुखी, कंबर दुखी, हाडांमधून कटकट असा आवाज येणे अशा प्रकारचे हाडांचे त्रास आपल्याला काढावे लागतात.

म्हणून आज आपणास एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण झपाट्याने वाढेल. अवघ्या सात दिवसांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढेल चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणते घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय कसा बनवायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला घ्यायचे आहेत ते म्हणजे पांढरे तीळ.

पांढरे तीळ भाजल्यावर आणखी प्रथिनं शरीराला मिळतात. कारण तीळ भाजल्यावर त्यातील ऑक्झेलेट्स आणि फायटेट्स कमी होतात. पचनशक्ती सुधारायला मदत होते. स्नायूंची बळकटी आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी प्रथिनं आवश्यक असतात त्याचबरोबर पांढरे तीळ मध्ये कॅल्शियम ची मात्रा जास्त असते त्यामुळे या मधून आपल्याला कॅल्शियम मिळते हे आपल्या शरीरासाठी गरम असतात.

हे वाचा:   अत्यंत महत्त्वाची माहिती.! एखाद्याने गोळ्या औषधे खूपच जास्त प्रमाणात खाल्ले तर काय करावे.! जीवघेणा प्रकार होण्याआधी हे करायला हवे.!

त्यामुळे याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला घरी बसल्या पांढऱ्या तिळाची पावडर नसेल बनवता येत तर बाजारामध्ये सहजपणे ही उपलब्ध होऊन जाते तर तुम्हीही तिळाची पावडर बाजारातून देखील खरेदी करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे वापरायचे आहे ते म्हणजे बाजरी. बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात.

जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक घटक मानले जातात. र’क्तदाब, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांवर नियंत्रण राखण्यासाठी ही पोषक तत्व शरीराला आवश्यक असतात. विशेषतः हिवाळ्यात बाजरी खाण्याला जास्त महत्व आहे. पण आपण कोणत्याही ऋतूमध्ये बाजरीची भाकरी खाल्ली किंवा बाजरी ने बनवलेले अन्नपदार्थ खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतात आणि फायदेशीर देखील.

जर आपल्या शरीरातील कॅल्शिअम लेवल आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला बाजरी चा माठ बनवून द्यायचा आहे त्यासाठी. आपल्याला एका पात्रांमध्ये अर्धा ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी टाकून त्यामध्ये बाजरीचे पीठ टाकायचे आहे आणि त्याला तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत त्याची बारीक खिमटी होत नाही. हे किमती बनवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गोडवा असेल तर खडीसाखर याचा वापर करायचा आहे सोबतच हे खाण्याआधी आपल्याला रात्री भिजवून ठेवलेले चार ते पाच बदाम सोलून खायचे आहेत.

हे वाचा:   पुन्हा पुन्हा होणारी पाठ दुखी कायमची होईल बंद.! पाठदुखी चे हे असतात कारणे.! उतारवयात जाण्याआधी नक्की वाचा.!

त्यामुळे देखील आपल्या शरीराला स्फूर्ती मिळते आणि कॅलरी देखील मिळते. त्यानंतर बनवून घेतलेली ही खिमटी आपल्याला सलग नव्वद दिवस द्यायची आहे त्यामुळे दिवसभर थकवा येणार नाही उलट कॅल्शियमची पातळी भरपूर प्रमाणात वाढेल. आपल्याला बाजरीचा माठ म्हणजेच बाजरीची खिमटी ही सकाळी खायची आहे आपल्याला जी गोष्ट रात्री खायची आहे ती आहे, तिळाची पावडर आणि गरम पाणी.

आपल्याला एक ग्लास गरम पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे तिळाची पावडर टाकायची आहे आणि रात्री जेवल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी आपल्याला त्याचे सेवन करायचे आहे पण रात्री जेवल्यानंतरच् आपल्याला या पाण्याचा वापर करायचा आहे.जर रात्री काही कारणास्तव शक्य झाले नाही तर दुपारच्या जेवणानंतर आपण याचे सेवन करू शकतो. त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे रात्री या तिळाच्या पावडर चे सेवन करणे अनिवार्य आहे.

या दोन्ही गोष्टी सतत नव्वद दिवस केल्याने आपल्या शरीरामधील कॅल्शिअमचे पातळी वाढेल आणि गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडांमधून येणारा कटकट असा आवाज कायमचा निघून जाईल आणि आपण तंदुरुस्त होऊ. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.