कुठलेही व्हायरल इन्फेक्शन अगदी झटपट बरे.! पावसाळ्यात होणारा खोकला, सर्दी, घसा होईल मोकळा.! सलग खाल्ल्याने काय होईल नक्की वाचा.!

आरोग्य

सर्वांच्याच आवडीचा ऋतू म्हणजेच पावसाळा. पावसाळा आला की चोहिकडे परिसर हिरवागार होवून जातो. झाडांना व पशू पक्षांना पाणी मिळते. नद्या तथा धरणे तुडूंब भरुन वाहू लागतात. शेतकरी आपल्या शेतीच्या कामांना प्रारंभ करतो. मुलांच्या शाळा देखील सुरु होवू लागतात. असा हा पावसाळा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात नवी उमंग घेवून येतो. मात्र या सोबतच पावसाळा आपल्या सोबत सर्दी- पडसे, ताप व खोकला देखील घेवून येतो.

या ऋतूत आपली रोगाशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती कमजोर होते व आपण त्वरित आजारी पडतो. लहान मुलांपासून ते मोठ्यां प्रौढां पर्यंत सगळ्यांना खोकला व सर्दी हे दोन आजार होतातच आणि मग दवाखान्यात धाव घ्यावी लागते. मात्र आता तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे. आम्ही आज आमच्या या लेखाद्वारे तुमच्यासाठी याच पावसाळ्यातील छोट्या पण त्रास दायक आजारातून मुक्त होण्याचे उपाय सांगणार आहोत.

ही उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. पावसाळा सुरु झाला म्हणजेच बाहेर येता तथा जाताना भिजणे होतेच आणि या मुळेच सर्दी,पडसे व खोकला हे बरीक आजार होणे स्वाभाविक आहे. खोकला खूप काळ शरीरात असणे त्रासदायक ठरू शकते डॉक्टरांची औषधे खाल्यास थोड्या वेळासाठी आराम मिळतो मात्र काही काळाने परत खोकला होवू लागतो. सतत खोकत राहिल्याने फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो तसेच हा खोकला पुढे जाऊन महा भयंकर टी. बी चे रूप घेवू शकतो.

हे वाचा:   सकाळी फक्त एक चुटकीभर घ्या, घसा एकदम मोकळा होईल, सर्दी, खोकला छाती मध्ये असलेला कफ एका दिवसात जाईल, अत्यंत सोपा उपाय...!

म्हणून याला वेळीच आळा घालणे जरूरीचे आहे. आयुर्वेदामध्ये घरचा वैद्य म्हणून एक संच महान वैद्य व ऋषींनी लिहून ठेवला आहे. या संचात अनेक अश्या छोट्या आजारांना आपण घरच्या घरीच मूळा पासून उपटून काढू शकतो. सोबतच हे उपाय अत्यंत नैसर्गिक आहेत. शरीराला याची कोणत्याच प्रकारची हानि होत नाही. हा खोकला नष्ट करण्याचा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे गुळाच्या बरीक तुकड्याची.

गुळामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. अनीद्रा तसेच अशक्तपणा आला असेल तर रोज सकाळी गूळ नक्की खा. या नंतर अर्धा चमचा मीठ देखील आपण या उपायात घ्यायचे आहे. मीठात आयोडिन असते हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते. घासा बसला असेल तर मीठाच्या गुरळ्या आज ही केल्या जातात या मुळे घश्यात असणारे किटाणू मारतात व आवज परत आपल्या रोजच्या पट्टीत येतो.

या नंतर आपल्याला अवश्यकता आहे हळदीची. होय हळदीचे आयुर्वेदामध्ये एक वेगळे स्थान आहे. हळद दर्द शमाक आहे. अनेक हळद गुणधर्मांनी भरलेली आहे कॉपर, मैग्नेशियम, झिंक व आयरन हे घटक हळदीत आढळून येतात. या नंतरचा घटक आहे काळीमिरी. काळीमिरीत देखील अनेक उपयुक्त घटक आहेत जे आपल्याला खोकला आणि सर्दी यां पासून दूर ठेवण्यास मदत करते म्हणूनच या मिश्रण काळीमिरीचा समावेश नक्कीच करावा.

हे वाचा:   हातापायांना येत असतील मुंग्या तर अशावेळी करावे लागते हे एक साधे सोपे काम.! त्यामागे असते हे मुख्य आणि प्रमुख कारण.!

मात्र लहान मुलांना देताना काळीमिरी थोडी कमी प्रमाणात टाकावी. जर तुम्हाला खोकला सुका असेल तर या उपयात अर्धा चमचा तूप नक्की टाका. कारण तूप आपला साठलेला कफ विरळ करते तसेच ज्यांना ओला खोकला आहे त्यांनी हा उपाय करताना या मिश्रणात आल्याचा रस टाकावा याने तुम्हाला झालेला कफ शरीराच्या बाहेर पडण्यास मदत होईल. या सर्व घटकांचे मिश्रण बनवून तुम्ही चार ते पाच दिवस रात्री ग्रहण केल्यास तुम्हाला होणारी सर्दी व खोकला गायब होईल.

कोणते ही केमिकल न वापरता तुम्ही तुमचा खोकला व सर्दी अगदी सहज संपुष्टात आणू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.