अनेक वेळा केसांमध्ये कोंडा होने ही समस्या महिलांना तसेच तरुण वयात येणाऱ्या मुला मुलींना दिसून येत असते. याबाबतची अनेक कारणे सांगितले जातात परंतु यासाठी आपण बरेचसे पैसे खर्च करत असतो. पण एवढे सगळे करायची काही गरज नाही आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे घरगुती उपाय तुम्ही नक्की करून बघावे. जेणेकरून तुमचा कोंडा पूर्णपणे गायब होईल.
सर्वप्रथम कडुलिंबाचा उपाय पाहूया हा कडुलिंबाचा उपाय करण्यासाठी आपल्याला पाव कप कडुलिंबाचा रस लागणार आहे. त्याचबरोबर नारळाचं दूध व बीटाचा रस लागणार आहे. या कडुलिंबाच्या रसामध्ये नारळाचे दूध व बीटाचा रस एकत्र करून त्यात चमचाभर नारळाचा तेल टाकावे व हे मिश्रण एकत्र करून घ्यावे त्यानंतर हे सर्व मिश्रण एका वाटीत काढून घ्यावे व टाळूवर चांगल्या प्रकारे लावावे.
असे करून वीस मिनिटांनी केस हे हरबल शाम्पू ने चांगल्या प्रकारे धुवावे हा उपाय जर तुम्ही आठवड्यातून किमान दोनदा केला तर यामुळे नक्कीच तुमच्या डोक्यातील कोंडा हा गायब झालेला तुम्हाला दिसेल. कोंड्या बाबतची समस्या आहे आणि लिंबाचा वापर नाही असे होणारच नाही लिंबू हे कोंडा घालवण्यासाठी फार उपाय कारक मानले जाते त्यामुळे क्रमांक दोनचा उपाय हा लिंबाचा असणार आहे.
यासाठी आपल्याला अर्धे लिंबू लागणार आहे कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी लिंबाची फोड थेट टाळूवर दहा ते पंधरा मिनिटे चोळावी व नंतर शाम्पू च्या साह्याने केस धुवून काढावे. हा उपाय तुम्ही दररोज दहा ते पंधरा मिनिटे सलग सात ते आठ दिवस करत राहिला तर तुम्हाला भरपूर फायदा होईल डोक्यातला कोंडा पूर्णपणे गायब झालेला दिसेल पुढील उपाय हा बेकिंग सोडा द्वारे करण्याचा आहे.
बेकिंग सोडा हा अल्कलाइन पदार्थ असल्यामुळे टाळूमध्ये असलेल्या मृत पेशी काढून टाकण्यात याचा खूप फायदा होतो. आंघोळ करताना थोडेसे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकून याची जाडसर पेस्ट बनवावी त्यानंतर या पेस्टच्या साह्याने टाळूची चांगल्या प्रकारे मसाज करावी व नंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करावा असे केल्याने केसातला कोंडा गायब होईल.
कोरफडीच्या उपायाने देखील केसातील कोंडा पूर्णपणे गायब केला जाऊ शकतो कोरफडीचा गर हा थंड आणि एंटीबॅक्टरियल असल्यामुळे कोंड्याची समस्या यामुळे पूर्णपणे गायब होत असते आंघोळीपूर्वी कोरफडीचा गर केसांना लावावा त्यानंतर अंघोळ करावी असे केल्याने केसातला कोंडा पूर्णपणे जाईल. मेथी दाण्याचा उपाय यासाठी खास फायदेशीर ठरेल रात्रभर दोन चमचे मेथीचे दाणे भिजवत ठेवावे सकाळी त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये विनेगर टाकावे.
बनवलेले हे मिश्रण जवळपास तीस मिनिटांसाठी केसांवर लावून ठेवावे. त्यानंतर एखाद्या शाम्पूच्या साह्याने केस धुवून काढावे केसातील पूर्ण कोंडा गायब झालेला दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.