वयानुसार आपले शरीर देखील ठिसूळ व कमजोर होत जाते. शरीरात रक्ताची च कॅल्शियमची कमी होवू लागली की सोबतच सांधेदुखी व इतर आजार देखील लगेच होवू लागतात. आजच्या या लेखात आपण अश्या तीन डाळींच्या बाबत माहिती घेणार आहोत ज्यांना तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात आवर्जून समाविष्ट करयला हवे. यांच्या सेवनाने शरीरात कमालीची ऊर्जा धावू लागेल.
या सोबतच रोगांशी लढणारी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढेल. चला आता वेळ न दवडता पाहूया नक्की कोणत्या आहेत या डाळी. सर्व प्रथम आहे हरभरा अथवा चणा. ही शरीरातील रक्ताचं प्रमाण योग्य राखण्यास मदत करतं. अॅनिमियापासून मुक्ती मिळवायची असेल तर आहारात भिजवलेल्या हरभऱ्याचा समावेश करता येईल. हरभरा व चण्याच्या डाळीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते.
या सोबतच प्रथिने, कर्बोदके, चरबी, तंतुमय पदार्थ जसे फायबर, कॅल्शियम, जीवनसत्त्वं आढळतात. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी यांची भूमिका महत्त्वाची असते. भिजवलेले हरभरे खाल्ल्यानं रक्त शुद्ध होतं. तसेच, मेंदू तीक्ष्ण होतो. वजन वाढीसाठी व रक्त शुद्धीसाठी कच्चे हरभरे खाणे फायदेशीर मानले जाते. या नंतरची डाळ आहे मूग डाळ. ही फार पौष्टिक मानली जाते. कारण यात जीवनसत्व अ, ब, क आणि इ चे प्रमाण अधिक असते.
सोबतच पोटॅशिअम, लोह, कॅल्शियम देखील मूगात आढळतात. याचे सेवन केल्यास शरीरात कॅलरीज वाढत नाहीत. जर मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यास शरीरात केवळ 30 कॅलरी आणि 1 ग्रॅम फॅट पोहोचतात. मोड आलेल्या मूगात मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन यांसारखे पौष्टिक तत्व आढळतात. मोड आलेले मूग खाल्यास शरीरात इन्सुलीन लेव्हल वाढण्यात मदत मिळते.
यासोबतच याने ब्लड ग्लूकोजही कंट्रोलमध्ये राहते. मूगातील काही पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी वाढते. मूगाच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ-द्रव्य कमी होतात. यासोबतच पचनक्रिया नेहमी चांगली राहते. तसेच पोटासंबंधी आजारही कमी होतात. शेवटची व तीसरी डाळ आहे कुलिथ डाळ.
कुळीथात कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आणि अमिनो ऍसीड असतात. ज्याचा परिणाम पुरूषांच्या आरोग्यावरही चांगला होतो. कुळीथाचे सेवन केल्यामुळे पुरूषांचा स्प’र्म काऊंट वाढण्यास मदत होते. कुळीथातील मिनरल्समुळे त्याच्या प्रजनन क्षमतेवर चांगला परिणाम होतो.
कुळीथाच्या बियांमध्ये फ्लेवोनॉईड आणि पोलीफेनॉईल मुबलक असतात.
ज्यामुळे तुमच्या यकृत आणि स्वादुपिंडाच्या कार्यावर चांगला परिणाम होतो. आहारात कुळीथाचा समावेश असेल तर तुमचे रक्त शुद्ध होते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. जर हे कार्य सुरळीत झाले नाही तर शरीरातील पित्त, कफ आणि वात दोष वाढतात आणि आजारपणाला सुरूवात होते. यासाठीच यकृताचे कार्य सुरळीत होणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला याबाबत काही त्रास असेल तर आहारात कुळीथाचा समावेश नक्कीच करा.
शरीरात कॅल्शिअम फॉस्फरेट मीठाचे खडे निर्माण झाल्यामुळे किडनी स्टोन अथवा मू’तखड्याचा त्रास जाणवू लागतो. मात्र कुलिथाची डाळ या वर देखील खूप फायदेशीर आहे. कुलिथाची डाळ खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे अँटी ऑक्सिडंट मिळतात आणि याचा फायदा असा होतो की मू’तखड्याची निर्मिती यामुळे रोखली जाते. किडनी स्टोनचा धोका कमी करण्यासोबतच जर तुम्ही आहारात या डाळीच नक्की समावेश केला तर तुमच्या किडनीच्या आरोग्य समस्या कमी होऊ शकतात.
या डाळीच्या सेवनाने चेहर्याच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येवू लागेल. या तीन्ही डाळींचा आपल्या आहारात नक्कीच समवेश करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.