घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी, घरातील व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण रहावे, कुटुंबातील सदस्यांची प्रगती व उत्कर्ष व्हावा. घरात संपन्नता व शांती रहावी म्हणून प्रत्येक व्यक्ती दिवसरात्र काबाडकष्ट करत असते. आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्याकरता सर्वच लोक दिवसरात्र मेहनत करतात. आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रयत्न करत असतो, मात्र घरांमध्ये पैसा टिकत नाही ज्यामुळे कौटुंबिक कलह व मानसिक अशांतता काही केल्या कमी होत नसते.
अशा परिस्थितीमध्ये घरातील एकंदरीत सर्व कुटुंबीयांना या गोष्टींचा त्रास होत असतो. घरातील पैसाअडका लवकर संपतो, तसेच घरामध्ये वेळोवेळी पैशाची चणचण भासू लागते, अशामुळे घरांतील सदस्यांमध्ये वाद-विवाद, भांडणे होतात.
घराचे आर्थिक स्थैर्य डगमगते. घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले रहावे, कुटुंबातील व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य चांगले रहावे, घरातील मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, आर्थिक प्रगती व्हावी तसेच सर्व कुटुंबिय गुण्यागोविंदाने एकत्र रहावे याकरता लोक खूप प्रयत्न करत असतात.
घरामधील क्लेश, भांडणे व वाद मिटून जावे, घरातील कुटुंबियांमध्ये परस्पर सामंजस्य रहावे यासाठी अनेक लोक वास्तूतज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतात. या व्यतिरिक्तही वास्तुशास्त्रामध्ये सुखी कौटुंबिक जीवनासाठी अनेक चांगल्या वास्तू टिप्स सांगितल्या गेल्या आहेत. या टिप्सचा वापर आपण दैनंदिन जीवनात केलात तर आपल्या घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते व शांतता प्रस्थापित होते.
आज आम्ही आपल्याला ज्या पारंपारिक वास्तुटिप्स बद्दल माहिती देणार आहोत, ती आहे मातीचा हंडा किंवा मातीची घागर! वास्तूशास्त्रानुसार घरांमध्ये मातीची घागर किंवा मातीची सूरई पाण्याने भरून ठेवल्यामुळे घरातील सर्व समस्या आपोआप दूर होत असतात.
वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये पाण्याने भरलेली सुरई जर ठेवली तर घरामध्ये कधीही धनसंपत्तीमध्ये कमतरता राहत नाही. मातीपासून बनवलेली देवाची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरामध्ये पैशासंबंधी सर्व समस्या दूर होतात. तसेच घरामध्ये धनाची कमतरता कमी होऊन लागते व आर्थिक स्थैर्य देखील लाभते.
घरामध्ये मातीच्या घागरीमध्ये पाणी भरून त्यासमोर जर दिवा लावला तर घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात. व नवे आर्थिक उत्पन्नाचे मार्ग सापडतात. घरातील कोणतीही व्यक्ती मानसिक दृष्ट्या तणावाखाली असेल व त्याचे मानसिक स्वास्थ्य चांगले नसेल तर अशा व्यक्तीच्या हातून मातीच्या भांड्यातून किंवा मातीच्या घागरी तुम्ही कोणत्याही झाडाला किंवा रोपाला पाणी द्यायला सांगावे, त्यामुळे अशा व्यक्तींना लाभ होतो व त्यांचे मानसिक स्वास्थ्यदेखील सुधारते.
तर या होत्या काही पारंपारिक वास्तुशास्त्रीय टिप्स, ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगात आणल्या तर आपण देखील आपल्या घराच्या व कुटुंबाच्या भाग्यासाठी आरोग्यासाठी व सुख-शांतीसाठी लाभदायक ठरतील! आपणही या पारंपारिक वास्तूशास्त्राच्या टिप्स वापरून आपल्या घरामध्ये सुख शांती व आनंद परत आणू शकतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.