कांद्याचे हे तेल एकदा केसांना लावा, केसातला सर्व कोंडा नष्ट होईल, केसांची वाढ दुप्पट होईल.!

आरोग्य

आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण कांद्याचा वापर करत असतोच, कांद्याच्या गुणांमुळे आपल्या शरीराच्या पोषणामध्ये भर पडत असते. रोजच्या जेवणामध्ये कांदा खाण्याची देखील लोकांना सवय असते. भाजी बनवताना कांदा टाकण्याबरोबरच काही लोक जेवनात कच्चा कांदा खात असतात. मात्र कांद्याचा जेवनासोबतच केसांसाठी  देखील उपयोग होऊ शकतो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

कांद्यापासून बनलेले तेल हे केसांच्या मुळांना मजबूत करते व केसांच्या सर्व समस्या पासून आपल्याला मुक्ती देते. तसेच ज्या लोकांचे केस वाढत नाहीत त्यांचेदेखील कांद्यामुळे केस वाढू लागतात. थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाणी केसांसाठी वापरल्यामुळे केस जास्त कोरडे आणि बेजार होतात. ज्यामुळे केस अशक्त होतात व तुकडे पडून तुटू लागतात. अनेक वेळा केस इतके जास्त प्रमाणात गळतात की केसगळती मुळे टक्कल पडते की काय याची  लोकांना भीती वाटू लागते.

थंडीच्या दिवसांमध्ये केस गळण्याचे मुख्य कारण जास्त गरम पाणी वापरणे हे आहे. सोबतच आपण केसांकरता जे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरतो ते देखील तेवढेच जबाबदार आहेत. अशावेळी आपण केसांवरती केमिकलयुक्त शैम्पू वापरण्यापेक्षा प्राकृतिक वस्तूंचा जर वापर केला तर आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहू शकते. आयुर्वेदात केसांच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होण्याचे उपाय सांगितलेले आहेत.

हे वाचा:   कृपा करून हे मीठ वापरणे आजच्या आज बंद करा.! कारण वाचून थक्क व्हाल.!

जर आपल्याला ही केसगळतीची समस्या आहे किंवा केस खूपच जास्त प्रमाणात तुटत आहेत तर आपण कांद्या पासून बनलेले तेल केसांवर व डोक्यावरती मसाज केल्यास, आपले केस गळण्याचे थांबेल व केस मजबूत देखील होतील. कांद्या मधील प्राकृतिक तत्व केसांच्या मुळांना मजबूत करण्याचे काम करतात. कांद्याचे तेल केवळ केसांची वाढ करत नाहीत, तर केस गळण्यापासून देखील पूर्णपणे रोखतात.

या लेखाद्वारे आम्ही आपल्याला केसांच्या समस्यांवरती कांद्याचे तेल कसे काम करते याबद्दल माहिती देणार आहोत! तसेच हे तेल घरी कसे बनवायचे हे देखील सांगणार आहोत.

कांद्याचे तेल केसांच्या अगदी मुळापर्यंत जाऊन केसांना कंडिशनिंग करतात व कोरड्या झालेल्या केसांमध्ये देखील जीव येतो. या तेलाने केसांची मुळे मजबूत होतात, कोंडा देखील केसांतून निघून जातो. केस गळती पूर्णपणे थांबते.

१.कांद्याचे तेल बनण्याकरता सर्वांत अगोदर आपण कांदा कापून त्याला मिक्सरमध्ये बारीक करुन त्याचा रस बाहेर काढा.

२.कांद्याचा रस गाळणीतून व्यवस्थित गाळून घ्या. आता एका भांड्यामध्ये नारळाचे तेल आणि कांद्याचा रस एकत्र करून टाका. आता या मिश्रणाला चांगली उष्णता द्या व याचा रंग बदलेपर्यंत कांद्याचा रस तेलात शिजू द्या.

हे वाचा:   संजीवनी बुटी सुद्धा यापुढे फेल आहे, फक्त दोन पाने अशी खाल्ल्यास सकाळी हे आजार गायब.!

३.थोड्या वेळानंतर गॅस बंद करा व तेल थंड झाल्यानंतर चाळणीच्या साह्याने गाळून घ्या. एका स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये हे तेल भरून ठेवा.

हे तेल आपण सहा महिन्यापर्यंत वापरू शकता. कांद्याचे तेल वापरण्याचा विधी- कांद्याचे तेल केसांना लावण्याअगोदर आपल्या केसांना दोन भागांमध्ये सेपरेट करा. त्यानंतर तेल हातावर घेऊन केसांच्या मुळाशी हळूहळू हलक्या हाताने केसांच्या मुळाशी मसाज करा.

एक तासानंतर चांगल्या शाम्पूने केस धुऊन टाका. जर आपल्याला जास्त केस गळती होत असेल तर हा उपाय आठवड्यातून दोन वेळेस करा. बाकी लोकांनी महिन्यातून एकदा हा उपाय केला तरी चालेल. यामुळे आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *