मुलींनो गालावर एकही केस परत उगणार नाही.! त्यासाठी करायला लागेल एवढं सोप्प काम.! नको ते केस असे कायमचे ब्लॉक करा.!

आरोग्य

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खूपच प्रेम असेल. मुलींना तर त्यांच्या चेहऱ्यावर खूप प्रेम असते त्या सतत आपला चेहरा सुंदर बनवण्याच्या पाठीमागे लागलेले असतात. अनेक वेळा मुलींच्या चेहऱ्यावर नको त्या ठिकाणी केस उगलेले दिसतात. मुलींच्या चेहऱ्यावर केस हे मुळीच छान दिसत नाही. जर ते पुरुषांच्या चेहऱ्यावर असेल तर त्यांना ते शोभून दिसतात. अशावेळी मुलींना काही सोपे उपाय सांगितले जातात.

यामुळे चेहऱ्यावर असलेले केस पूर्णपणे नष्ट होतात शिवाय पुन्हा उगण्याचे चान्सेस सुद्धा फारच कमी असतात. त्यासाठी तुम्ही हे उपाय नक्की करून बघा. चेहऱ्यावरील अनावश्यक केसांमुळे संपूर्ण चेहऱ्याचा लुक बिघडतो. हे केस काढण्यासाठी काही जणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन भरपूर खर्च करतात. पण पार्लरमधील त्रासदायक ट्रीटमेंट करण्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील सामग्रींचा वापर करून चेहऱ्यावरील अनावश्यक केस कमी करू शकता.

चेहऱ्यावरील केस दिसू नये, यासाठी काही जण ब्लीच सारख्या रासायनिक उत्पादनांचाही उपयोग करतात.पण चेहऱ्यासाठी हे हानिकारक प्रकार करण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या घरामध्येच असणाऱ्या वस्तू आणि तसंच फ्रीजमध्ये यासाठी काही ना काही उपयोगी नैसर्गिक सामग्री सापडतीलच. मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागणार नाही.

तसंच घरगुती घरगुती आणि नैसर्गिक उपचारांमुळे त्वचेवर दुष्परिणाम देखील होणार नाहीत. तर मित्रांनो या संबंधित सर्वात पहिला उपाय करत असताना आपल्याला बेसन, हळद आणि कच्च दूध यांचा वापर करून हा उपाय करायचा आहे. उपाय करत असताना एक चमचा आपल्याला बेसन पीठ एका वाटीमध्ये घ्यायच आहे आणि त्यानंतर एक चिमूटभर आपल्याला हळद घ्यायची आहे.

मित्रांनो या उपायासाठी तुम्हाला शक्यतो आंबे हळदीचाच वापर करायचा आहे आणि जर तुम्हाला आंबेहळद मिळाली नाही तर अशावेळी घरामध्ये असणाऱ्या हळदीचाही वापर करू शकता. तर एक चमचा बेसन पीठ त्यामध्ये एक चिमूट हळद आणि त्यानंतर एक ते दीड चमचा कच्चे दूध तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर याची एक व्यवस्थितपणे पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   ह्या भाजी मध्ये दडलेली आहे जादू.! भले भले आजार होतात फुर..! अनेक लोकांचे ऑपरेशन रद्द केले आहे या भाजीने.!

त्यानंतर ही पेस्ट आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो एक किमान अर्धा तासानंतर ज्यावेळी ही चेहऱ्यावर लावलेली पेस्ट चांगल्या पद्धतीने वाळेल. त्यावेळी तुम्हाला तुमच्या बोटांच्या मदतीने गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर मालिश करून ती पेस्ट उतरवायचे आहे. मित्रांनो जेव्हा तुम्ही ही पेस्ट उतरायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर असणारे सर्व केस निघून जातील.

त्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो चेहऱ्यावरील नको असलेले केस घालवण्यासाठी हा अत्यंत फायदेशीर उपाय आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा एक उपाय आपल्याला या समस्येसाठी करता येतो तो करत असताना मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी दोन चमचे लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे साखर घ्यायचे आहे.

हे दोन्ही पदार्थ एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याची एक व्यवस्थितपणे मिक्स करून त्याचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. मित्रांनो साखर पूर्णपणे लिंबूच्या रस मध्ये विरघळेपर्यंत तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच आहे आणि साखर विरघळल्यानंतर तुम्हाला ही जी पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावायचे आहे.

मित्रांनो पुन्हा तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवायची आहे आणि पूर्णपणे वाळल्यानंतर आपल्या हाताच्या साहाय्याने घासून आपल्याला ही पेस्ट उतरवायचे आहे. मित्रांनो यामुळे चेहऱ्यावर असणारे नको असलेले केस निघून जाण्यास मदत होते आणि हाताने ही पेस्ट उतरल्यानंतर पुन्हा आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे.

हे वाचा:   कच्चा कांदा खात असाल तर या गोष्टी माहिती असू द्या, कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरात होते असे काही.!

मित्रांनो तिसरा एक छोटासा उपाय आपल्याला आपल्या चेहऱ्यावर असणारे नकोसे केस घालवण्यासाठी करता येतो तो म्हणजे मेथी दाण्यास संबंधित. मित्रांनो रात्रीच्या वेळी तुम्हाला एक ते दोन चमचा मेथी दाणे एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळच्या वेळी जेव्हाही हे दाणे फुगतील म्हणजेच यामध्ये पाणी मुरेल तेव्हा तुम्हाला या मेथी दाण्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.

मित्रांनो ही पेस्ट आपल्याला थोडीशी घट्ट तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर आंबेहळद किंवा रेगुलर हळद मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला संपूर्ण चेहऱ्यावर लावायचे आहे. ही पेस्ट व्यवस्थितपणे वाळल्यानंतर तुम्ही हाताच्या साह्याने पेस्ट पुन्हा एकदा रगडून काढा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

मित्रांनो या उपायामुळे ही तुमच्या चेहऱ्यावर असणारे नकोशी केस तुटून पडतील. तर मित्रांनो असे हे घरगुती काही उपाय जर आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्या घरामध्ये केले तर आपल्या या समस्येवर करून बघितले तर यामुळे नक्कीच आपल्या चेहऱ्यावर असणारे अतिरिक्त केस नक्की निघून जातील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.