मागणारा कितीही मागू द्या कधीही देऊ नका या वस्तू; घरातली लक्ष्मी जात असते बाहेर.!

अध्यात्म

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दानधर्म करणे अगदी पुण्याचे काम मानले जाते. गरीब व गरजू व्यक्तीला दान केल्यामुळे आपल्याला पुण्य मिळत असते. बरेच लोक पैसे अन्न व कपड्यांचे दान करत असतात. असे म्हटले जाते की गरीब व्यक्तींना, महिलांना, लहान मुलांना व गरजू व्यक्तींना दान केल्यामुळे आपल्याला त्याचे धार्मिक लाभ व पुण्य मिळत असते.

मात्र धार्मिक ग्रंथांमध्ये दान-पुण्य करण्याची विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. या वेळेत दान केल्यामुळेच आपल्याला पुण्य लाभत असते. सकाळच्या वेळी दान करण्याचे काही नियम सांगितलेले आहे, त्यानुसार काही वस्तूंचे दान सकाळी पहिल्या प्रहरी करू नये, असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे सकाळच्या प्रहरी कोणत्या वस्तू दान करू नये याबद्दल माहिती सांगणार आहोत! चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू.?

दही – दह्यावर शुक्र ग्रहाचा अंमल असतो व शुक्र ग्रह ऐश्वर्य व संपन्नतेचा कारक ग्रह मानला जातो. यामुळे सकाळच्या पहिल्या प्रहरी आपल्याकडे कोणीही याचक आल्यास कधीही दह्याचे दान करू नये किंवा संध्याकाळच्या वेळी देखील दह्याचे दान करू नये.

हे वाचा:   स्त्री असो वा पुरुष असे काम कराल तर घरात लक्ष्मी कधीच टिकणार नाही.!

सौभाग्याचे अलंकार – महिलांनी आपल्या सौभाग्यासंबंधीचे कोणतेही अलंकार व वस्तू दान करू नये, त्यामुळे आपल्या सौभाग्याला बाधा लागते.

पैसे उधार देणे किंवा पैसे दान करणे – सकाळच्या पहिल्या प्रहरी जर आपल्याकडे कोणी पैसे दानात मागत असेल किंवा पैसे उधार मागत असेल तर कधीही सकाळच्या पहिल्या प्रहरी पैसे दान करू नये किंवा उधार देऊ नये, कारण हे पैसे आपल्याला कधीही परत मिळत नाही व आपला धनसंचय देखील हळूहळू कमी होऊ लागतो.

गुरुवारी हळद व पिवळ्या वस्तूंचे दान करु नये – गुरुवार हा बृहस्पतीचा वार असल्यामुळे व बृहस्पतीचा पिवळ्या रंगावर प्रभाव असल्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा  हळदीपासून बनलेल्या वस्तु गुरुवारी कुणालाही दान करू नये. कारण ब्रहस्पतीमुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी व ऐश्‍वर्य मिळत असते. तसेच ज्या व्यक्तीला गुरुबळ लाभते त्याला प्रत्येक कामांमध्ये यशप्राप्ती मिळत असते. अशा वेळी जर आपण गुरुवारी हळदीपासुन बनवलेल्या वस्तू किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू,कपडे दान केले तर आपल्यावर ब्रहस्पती नाराज होतात.

कांदा आणि लसूण – कांदा आणि लसूण यांच्यावर केतूचा प्रभाव असतो, यामुळे सकाळच्या प्रहरी जर कोणी आपल्याकडे कांदा मागत असेल, तर कांदा दान करू नये. यामुळे केतूचा प्रभाव आपल्या कुंडलीमध्ये कुप्रभाव सुरु होतो. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात.

हे वाचा:   या दिशेला बसून जेवण करणे म्हणजे आयुष्य कमी करणे; तुम्ही हि चूक करत असाल तर एकदा नक्की वाचा.!

कोथंबीर – सकाळच्या प्रहरी कधीही कोथिंबीर किंवा हिरव्या रंगाच्या पालेभाज्या किंवा हिरव्या रंगाची वस्तू कोणालाही दान किंवा उधार देऊ नये. त्यामुळे आपल्या घरांमधील समृद्धी निघून जाते.

सकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा – असे म्हटले जाते की प्रातःकाळी देवी-देवता आपल्या घरांमध्ये येत असतात, यामुळे कधीही सकाळच्यावेळी दरवाजा बंद करून बसू नये. तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा कटकट असा आवाज येत असेल किंवा काही बिघाड झाला असेल तर तो वेळीच दुरुस्त करून घ्यावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *