आपल्या भोवती असलेला निसर्ग आपल्याला नेहमीच काही ना काही वरदान स्वरूप देत असतोच. आपल्या आजूबाजूला अनेक झाडे, वृक्ष, रोपे असतात जे आपल्याला अनेक लाभ देत असतात. आपल्याला बऱ्याच अशा रोपांची माहिती नसते. झाडांचे अनेक आरोग्यदायी व आयुर्वेदिक महत्त्व आहे. अनेक वृक्षांचा व झाडांचा प्राचीन काळापासून जडीबुटी म्हणून उपयोग केला जातो.
मोठमोठे गंभीर आजार व असाध्य आजारांमध्ये देखील या जडीबुटी चांगला इलाज करतात. झाडे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे आपल्याला हे जीवन सहज जगता येत आहे. झाडांपासून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात. त्याचा आयुर्वेदामध्ये वापर केला जातो. तसेच आपण घरगुती उपचार म्हणून देखील अनेक झाडांच्या पानांचा रस व मुळांचा रस घेऊन आपले आजार बरे करत असतो.
आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे एका अशाच जडीबुटीच्या रोपाबद्दल माहिती सांगणार आहोत जिचा वापर केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते.
आज आम्ही ज्या रोपाबद्दल माहिती सांगाणार आहोत त्या रोपाचे नाव ‘दुधी’ असे आहे. हे दुधी नावाचे हे रोप आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र आपल्यातील बऱ्याच लोकांना माहीत नसते की याचा नक्की उपयोग काय करायचा.? चला तर जाणून घेऊया काय आहे त्या दुधी रोपाचे फायदे.?
पोटातील जंत- जर एखाद्या लहान मुलाच्या पोटामध्ये जंत झाले आहेत व त्यामुळे मुलाचे कायमच पोट दुखत आहे व जेवण देखील मूल व्यवस्थित करत नसेल तर अशा वेळी आपण या दुधीच्या झाडाचे दोन-तीन पानं तोडून घ्यावेत. रोज सकाळी हि दोन-तीन पाने मुलांना चावून -चावून खायला सांगावीत. या पानांमुळे पोटातील जंत शौचावाटे निघून जातात.
दातांची कीड – आपल्या दातांमध्ये किती ही भयानक कीड लागलेली का असेना मात्र आपण दुधीचा वापर या ठिकाणी करू शकता. दुधीची पाने चांगली स्वच्छ धुऊन दाताखाली चाऊन- चाऊन खावे. यामुळे दातामध्ये लागलेली कीड मुळापासून संपून जाते.
खोकला- खोकला दोन प्रकारचा असतो कोरडा खोकला व अोला खोकला! खोकल्यामध्ये आपल्याला अतिशय त्रास होतो व कधीकधी श्वास घ्यायला देखील त्रास होतो. जास्त प्रमाणात खोकला होत असेल तर दुधीचा रोपाचा रस काढून त्यामुळे थोडेसे मध मिसळून खोकला असलेल्या व्यक्तीला द्यावा. एकदा चाटन खाल्ल्याने देखील खोकला बरा होतो.
गुप्त रोगांमध्ये उपाय- जर एखाद्या व्यक्तीला गुप्तरोगाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला या दुधीच्या रोपाचा रस काढून त्यामध्ये अर्धा चमचा मध आणि थोडासा लसणाचा रस टाकून खाऊ घालावे. या उपायामुळे गुप्त रोग बरा होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.