बटाट्याची साल कधीही फेकू नका, इतके उपयोग आहेत की तुम्ही विचारही केला नसेल; एका रात्रीत डार्क सर्कल गायब.!

आरोग्य

निसर्ग आपल्याला फळांच्या व फुलांच्या रूपाने अनेक वरदान देत असतो,  त्यांचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो.  निसर्गाने दिलेली प्रत्येक वस्तू आणि पदार्थ हा शंभर टक्के उपयुक्तच असतो. आपण पाहिले असेल आपण जेव्हा आंबे खातो तेव्हा आंब्याच्या कोयी फेकून देतो. मात्र या आंब्याच्या कोयींचादेखील अनेक चमत्कारिक औषधी बनवण्याकरता आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो.

निसर्गातील कोणतेच पदार्थ वाया जात नसतात. कोणत्या ना कोणत्या मार्गे त्यांचा वापर केला जातो व ती उपयोगात आणली जातात. असेच काही आपण बटाट्याच्या बाबतीत देखील बोलू शकतो! बटाट्याच्या वरचे सालं आणि बटाटा दोन्हीही अतिशय उपयुक्त असतात. भारतीय पदार्थांमध्ये बटाट्याची स्थान सर्वांत उच्च आहे.

पण आपल्याला माहित आहे का बटाट्याची सालं जी आपण काढून फेकून देतो त्यामध्ये देखील अनेक प्राकृतिक गुण असतात, बटाट्याची साल ही देखील अनेक औषधी गुणांनी युक्त असतात. आज आम्ही आपल्याला बटाट्याच्या सालींचे जे अनेक फायदे होतात त्याबद्दल या लेखाद्वारे माहिती देणार आहोत.

आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली असतील किंवा उन्हात गेल्यामुळे आपल्या अंगाला सनबर्न झालेला असेल तर अशावेळी बटाट्याच्या सालांना मिक्सरमध्ये बारीक दळून त्याची पेस्ट बनवून गाळणीतून गाळुन त्याचा रस बाजुला करा. हा रस डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सुर्याच्या कडक ऊन्हामुळे झालेल्या सनबर्नपासून आपला बचाव करतो व या रसामुळे चेहरा उजळतो व त्वचा चमकदार व नितळ होते.

हे वाचा:   या पाच सवयीमुळे तुमची किडनी हळूहळू निकामी होत आहे, यातली एक जरी सवय तुम्हाला असेल तर सावधान व्हा.!

बटाट्याचा रसामध्ये नॅचरल स्किन ब्लिचिंग एजंट किंवा घटक असतात. चेहऱ्यावर मुरुमांचे व पिंपल्सचे डाग पडणे तसेच चेहरा उन्हामुळे काळवंडणे यासारख्या समस्येवर बटाट्याचा रस नियमितपणे चेहर्‍यावर लावल्यास चेहऱ्यावरचे डाग हळूहळू कमी होऊन काही दिवसातच पूर्णपणे नष्ट होतात. यामुळे आपला चेहरा अगदी चमकदार नितळ व गोरा उजळून होतो.

बटाट्याच्या सालामध्ये विटामिन बी३ भरपूर प्रमाणात असते. विटामिन बी३ आपल्या स्नायुंना शक्ती देण्याचे काम करते. या सोबतच बटाट्याच्या सालीमध्ये असलेले नॅकीन हा घटक कार्ब ला  ऊर्जेमध्ये परावर्तित करतो. आपल्या रोजच्या आहारामध्ये फायबर युक्त पदार्थ असणे अतिशय आवश्यक असते. ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये चयापचय क्रिया सुरळीतपणे चालते. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते.

बटाट्याच्या सालीमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते. त्यामुळे बटाट्याच्या सालीचे सेवन केल्यामुळे पचन तंत्र सुधारते. जर आपले केस अवेळी व कमी वयातच  पांढरे होण्यास सुरवात झाली असेल तर एका पातेल्यामध्ये बटाट्याला अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळा जेव्हा हे पाणी एक ते दोन चमचे शिल्लक राहील तेव्हा या पाण्याला थंड झाल्यावर केसांवर लावा. हा प्रयोग वारंवार केल्यानंतर आपले पांढरे झालेले केस देखील काळे होण्यास सुरुवात होईल. तर हे होते बटाट्याचे सालींची काही उपयोग, आपणही माहितीचा लाभ घेवुन बटाट्याच्या साली फेकुन न देता यापुढे उपयोगात आणु शकता.

हे वाचा:   तुम्ही रोज सकाळी शिळी चपाती किंवा भाकरी खाता का.? शिळी झालेली पोळी खाल्ल्याने पोटात नेमके काय होते माहिती आहे का.?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *