घराच्या आजूबाजूला कुठे पिंपळाचे झाड उगवले आहे का.? याद्वारे आपल्याला मिळत असतात असे संकेत.!

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो 9xMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण साधारणत: पाहिले असेलच की अनेक पक्षी हे आपल्या तोंडामध्ये झाडांच्या बिया चघळत इतरत्र विष्ठेवाटे पांगवत असतात. ज्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळी झाडे उगवत असतात. कावळे, चिमण्या या झाडांची फळे खातात, आपण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या घरांवर किंवा झाडांवर ही झाडे उठतांना पाहिलेले असेल! मात्र काही अशीही झाडे असतात जी इतरत्र उगवली तर त्या झाडांच्या आसपास असणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो.

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे पिंपळाचे झाड जर आपल्या घरावर किंवा आपल्या आजूबाजूला उगवले तर काय करावे याबद्दल माहिती सांगणार आहोत! आपल्या धर्मशास्त्रानुसार पिंपळाला अतिशय पवित्र वृक्ष मानले जाते!  कारण पिंपळामध्ये तिन्ही देवांचा वास असतो असे म्हटले जाते! पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, तर पिंपळाच्या खोडामध्ये श्री महादेवांचा वास असतो, तर पिंपळाच्या वरच्या भागांमध्ये ब्रह्मदेव निवास करत असतात, असे आपल्या संस्कृतीमध्ये मानले जाते!

या कारणांमुळे पिंपळाच्या वृक्षाचे पौराणिक व धार्मिक महत्त्व आहे. पिंपळाचे झाड कधीही तोडले जात नाही किंवा तोडले तरी त्याची विधीवत तोडणी करावी लागते. तसेच या पिंपळाच्या झाडाचे लाकूड कधीही जाळता कामा नये असे आपले धर्मशास्त्र सांगते. जर पिंपळाचे झाड आपल्या घरावर अचानकपणे उगवले तर आपल्या घरावर मोठे संकट देखील येऊ शकते. पती-पत्नीच्यामध्ये भांडणे वाढतात व घरांमध्ये कलह उत्पन्न होतो. पिंपळाचे झाड घराच्या पूर्वेला कधीही असता कामा नये.

हे वाचा:   सूर्योदयाच्या अगोदर म्हणावा हा एकमेव मंत्र; होतील सर्व मनातल्या इच्छा पूर्ण, एकदा नक्की जाणून घ्या या मंत्राबद्दल.!

पिंपळाचे झाड अतिशय पवित्र असल्यामुळे ते आपल्या घरावर बाळगणे किंवा ठेवणे हे चुकीचे असते कारण या वृक्षाचा वापर संपूर्ण जगासाठी असतो, म्हणून पिंपळाचे झाड जर आपल्या घरावर किंवा आजूबाजूला उगवले असेल तर विधिवत पूजा करून ते झाड मुळासगट हळुवार उपटून घ्यावे व एका कुंडीमध्ये त्याचे रोपण करून ती कुंडी देवाच्या मंदिरापाशी नेऊन ठेवावी.

वैज्ञानिक कारण पाहायला गेले तर पिंपळाची मुळे ही खूप जाड व भक्कम असतात. पिंपळाचे झाड जर घरावर उगवले व वाढले तर हळूहळू ती मुळे घराच्या पायापर्यंत जाऊन पोहोचतात व त्यामुळे संपूर्ण घरच ढासळते व घराला तडे जातात. याकरता देखील असे वृक्ष घराच्या वर उगवणे आपल्या वास्तूसाठी चुकीचे होईल व घर तुटून जाईल म्हणून पिंपळाच्या झाड तुमच्या घरावर किंवा घराच्या आजूबाजूला खेटून उगवले असेल तर ते वेळीच विधीवत धार्मिक पद्धतीने काढून घ्यावे व योग्य ठिकाणी रोपण करावे.

हे वाचा:   ४ जुलै रोजी बदलणार आहे या राशीचे नशीब, कधी विचार पण केला नव्हता एव्हढा लाभ होणार आहे, जाणून घ्या कसे असेल तुमचे राशिभविष्य.!

पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष असेही म्हणतात, कारण पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्ध यांना आत्मज्ञान झाले होते व त्यांना त्यातून स्वतःचा बोध झाला होता. पिंपळाच्या झाडाखाली ऋषी-मुनी तपस्या करत असत. त्यामुळे फळही लवकर मिळत असे म्हणूनच पिंपळाच्या झाडाला खूप पवित्र व धार्मिक महत्त्व आहे. म्हणून पिंपळाचे झाड आपल्या घरावर उगवून देणे हे चुकीचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *