घरामध्ये कधीही हे प्राणी पाळावेत कधीही भासणार नाही पैशाची कमतरता…! जाणून घ्या कोणते आहेत हे प्राणी जे प्रत्येकाने आपल्या घरात पाळावेत…!

अध्यात्म

आपल्यातील अनेक लोकांना पशुपक्षांबद्दल खूप प्रेम असते. भारतीय प्राचीण ग्रंथांमध्ये भूतदया करावी असे वर्णन केलेले आहे. बरेच लोक घरांमध्ये अनेक प्राणी पाळतात, कुत्रा, मांजर, ससा, कासव असे प्राणी पाळतात. तसेच विविध प्रकारचे पक्षी जसे कबुतर,पोपट,घुबड देखील पाळले जातात.

मात्र वास्तुशास्त्रानुसार अशा काही प्राण्यांना व पक्ष्यांना घरात ठेवणे व पाळणे चुकीचे मानले गेले अाहे. काही प्राणी आपल्यासाठी शुभ लक्षण घेऊन येतात. मात्र काही प्राणी घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणे वाढू लागतात व क्लेश आणि कटकटी देखील सुरु होऊ शकतात. आरोग्यसमस्या व आर्थिक अडचणी देखील ाुरु होतात.

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये कोणते प्राणी व पक्षी पाळावे त्या बद्दल माहिती देणार आहोत.

१.कुत्रा-  वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये कुत्रा पाळणे अतिशय शुभ मानले जाते. कुत्रा पाळल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. कुत्रा हे भैरवाचे म्हणजेच खंडोबाचे सेवक असल्यामुळे घरात कुत्रा पाळणे शुभ मानले जाते.
२.ससा पाळणे- घरामध्ये ससा पाळणे लहान मुलांसाठी चांगले मानले जाते.

हे वाचा:   एकादशीच्या वेळी जर तुम्ही व्रत ठेवत असाल तर या गोष्टींची माहिती तुम्ही ठेवली पाहिजे; ९०% लोकांना माहीत नसलेलं सत्य.!

३. कासव पाळणे- विष्णू देवाचे प्रिय असलेले तसेच लक्ष्मी-मातेला देखील आवडते असलेले कासव घरात पाळणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे घरामध्ये संपत्तीची वाढ होते व घरामध्ये ऐश्वर्य नांदू लागते. आपण कासव पाळण्याऐवजी तांब्याच्या कासवाची प्रतिमा देखील घरामध्ये ठेवू शकतो. त्यामुळे देखील घरांमध्ये वैभव वाढते.

४. बेडुक पाळणे-  वास्तुशास्त्रानुसार घरांमध्ये बेडूक ठेवणे देखील शुभ मानले जाते. आपण बेडुक पाळण्याऐवजी बेडकाची प्रतिमा किंवा बेडकासारखे प्रतीक असलेली मूर्ती देखील घरात ठेवू शकता.

५ पोपट पाळणे-  घरामध्ये पोपट पाळणे अतिशय शुभ असते, असे म्हटले जाते की घरामध्ये येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा व अशुभ घटनांना पोपट पाहू व समजू शकतो.  व त्या घटनांना तो परतवून देखील लावू शकतो.

६. कबूतर- घरामध्ये कधीही कबुतर पाळु नये. कबूतर पाळल्यामुळे घरामध्ये दरिद्री येते व घरामध्ये कलह निर्माण होतो. वास्तूशास्त्रानुसार कबूतराला घरात ठेवणे अशुभ मानले जाते.

हे वाचा:   आजच्या सोमवार पासून होणार आहे खूप मोठा साक्षात्कार, स्वामींच्या कृपेने सातही दिवस होत राहील भरपूर धनलाभ, जाणून घ्या 10 एप्रिल ते 16 एप्रिल साप्ताहिक राशिभविष्य

७.घोडा पाळणे- घरात घोडा पाळणे हे वैभव व ऐश्वर्याचे प्रतिक मानले जाते. घोडा पाळल्याने श्रीमंतीत वाढ होते. मात्र प्रत्येकाला घोडा पाळणे शक्य नसते.अशावेळी घोड्याचे प्रतिक किंवा चित्र घरात लावणे देखील शुभ मानले जाते.

तर हे होते काही वास्तुशास्त्रातील नियम. वास्तूशास्त्रानुसार  घरामध्ये कोणते पशुपक्षी पाळावे व पाळू नये याबद्दलचे ज्ञान आपणांस मिळाले असेल. आपणही जर घरामध्ये कोणता पशु किंवा पक्षी पाळणारा असाल तर या नियमांकडे लक्ष द्यावे व त्याप्रमाणेच पशुपक्षी घरात आणावे अन्यथा आपल्या वास्तुमध्ये दोष निर्माण होऊ शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

  1. टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *