असा अंगठा असणारे लोक असतात खूपच चतुर; कधीच कोणत्याही गोष्टीत मागे पडत नाही.!

अध्यात्म

ज्योतिष शास्त्रात अनेक शाखा आहेत. यापैकी समुद्रशास्त्र हे व्यक्तीच्या विविध अवयवांच्या आकारावरून आणि हावभावावरून त्या व्यक्तीचे भविष्य, स्वभाव यांविषयी माहिती देते. तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उघड करणाऱ्या निरनिराळ्या गोष्टी असतात. तुमच्या आवडीनिवडी, तुमचे आवडते रंग, तुमची रास, तुमची जन्मतारीख इत्यादी गोष्टींवरून तुमचे व्यक्तिमत्व नेमके कसे आहे हे सांगता येऊ शकते.

हाताच्या तळव्याचा आकार, उंचसखलपणा,रंग व त्यावरील त्वचेचे स्वरूप बोटांची ठेवण, त्यांची लांबी-रुंदी, पेरीव त्यांची वैशिष्ट्ये नखे व त्यांचा आकार आणि तळहातावरील उंचवटे, रेषा व चिन्हे या सर्वांच्या वरून नियमांच्या साहाय्याने माणसाचा स्वभाव, अनुवंश, पात्रता आणि घडलेल्या व पुढे घडणाऱ्या सुख-दुःखात्मक घटना यांचा अंदाज वर्तविणारे शास्त्र म्हणजे हस्तसामुद्रिकशास्त्र होय.

अंगठा हे उजव्या हाताच्या पंजाला सर्वात उजवीकडे व डाव्या हाताच्या पंजाला सर्वात डावीकडे असलेले बोट आहे. सगळ्या बोटांमधले एकमेव बोट आहे अंगठ्याच्या ह्या रचनेमुळे माणूस बरीचशी कामे करण्यास समर्थ होतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अंगठ्यावरून आणि त्याचा आकारावरून तुमचा स्वभाव कसा ओळखला जातो.

हे वाचा:   माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी एक तांब्या पाण्याचा करा हा सोप्पा उपाय; धन संबंधित समस्या होतील कायमच्या दूर.!

ज्योतिष शास्त्रानुसार जर कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्याचा आकार त्याच्या हाताच्या आकारानुसार कमी किंवा छोटा असेल तर असे मानतात कि त्यांच्यात काम करण्याची कार्यक्षमता कमी असते. या व्यक्ती कोणतेही काम कमी वेगाने करतात. असे सुद्धा मानले जाते की अश्या व्यक्ती इतरांपेक्षा थोडे कमजोर असतात.

या शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या हाताचा अंगठा लवचिक असतो म्हणजेच तो अंगठा पूर्ण पणे मागे फिरतो. अश्या व्यक्तीसुद्धा त्या अंगठ्यासारख्याच असतात एकदम लवचिक. या व्यक्ती कोणत्याही परिस्थिती सक्षम राहतात. परिस्थितीनुसार वागतात. या व्यक्ती हट्टी स्वभावाचे नसतात. जर कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्याचा मधला भाग जास्त लांब असेल तर अशा लोकांची तर्कबुद्धी खूप चांगली असते.

यांच्या अशा तर्कबुद्धीने आणि हुशारीने या व्यक्ती समाजात मान सम्मान प्राप्त करतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हाताचा अंगठा त्याच्या हातासोबत त्रिकोण बनवत असेल तर शास्त्रानुसार या व्यक्ती खूप प्रेमळ स्वभावाच्या असतात. या व्यक्ती कधीही दुसर्यांना मदत करण्यास तयार असतात. तसेच त्या दयाळू आणि प्रेमळ सुद्धा असतात.

हे वाचा:   श्रावण महिन्यात हे काम चुकून सुद्धा करू नये, अन्यथा अशा लोकांवर भगवान शिव होत असतात नाराज.! नाहीतर उपवासाचा फायदा आजिबात होणार नाही.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *