घरात कोहळ का बांधतात.? कोहळ लावण्याचे असतात हे चमत्कारी फायदे..घरासाठी खूप लाभदायक.!

अध्यात्म

आपल्या हिंदू ध-र्मामध्ये घराच्या बाहेर कोहळ बांधण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी तर छोटीशी काळी बाहुली असते ती सुद्धा बांधण्याची पद्धत आहे .पण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोहळ बांधण्याची पद्धत का आहे ? घराच्या बाहेर दारामध्ये कोहळ बांधल्यानंतर कोणता फायदा होतो ? या सर्व प्रकारच्या गोष्टीची माहिती आपल्याला हिंदु शास्त्रात पाहायला मिळते. तसेच हे कोहळ बांधल्यावर घराला कोणते फायदे होतात ही माहिती सांगितली आहे.

प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की घराच्या बाहेर दारांमध्ये अनेक लोक कोहळ बांधतात. तसेच हे कोहळ लाल कपड्यांमध्ये बांधतात याने आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही आणि जरी कोणाची वाईट नजर लागली तर ती निगेटिव्ह ऊर्जा सर्व हे कोहळमध्ये सामावून जाते. परिणामी घरात त्या ऊर्जेचा इतका परिणाम होत नाही. आपल्या घरात मुख्य द्वारावर हे कोहळ बांधल्यास बाहेरून येणारी दुष्ट शक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही .

नजर दोषापासून आपल्या घराचे रक्षण होत असते म्हणून हे कोहळ बांधण्याची पद्धत आपल्या पूर्वजांच्या पासुन चालत आलेली आहे .बाहेरून कोहळ आणत असताना कधीही देठासहित कोहळ घरी आणावे आणि घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने घरामध्ये धुवावे. त्यानंतर या कोहळ्याला पुसून घ्यावं आणि त्यानंतर या कोहळ्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा आणि तो गंधाने म्हणजेच कुंकू थोडं ओलं करून काढावा.

हे वाचा:   बांदा घरात घेऊन या.. घराची चहूबाजूंनी प्रगती होईल. करा हा उपाय.!

त्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावे आणि त्याच पद्धतीने खाली स्वस्तिक काढावे. त्या कोहळ्या वरती काजळाने एखादी रेष ओढावी आणि मग हा कोहळ आपल्या देवघरात देवा समोर ठेवून त्या कोहळ्याची गंध ,अक्षदा हळद-कुंकू ,फुल यांनी पूजा करावी आणि बाहेरून येणाऱ्या वाईट ऊर्जेपासून रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी.

शक्यतो हे कोहळ लाल वस्त्रांमध्ये बांधायचा आहे. कधी कधी काही लोकांना लाल कपड्यात बांधल्यानंतर लवकर खराब होत असतं तर अशा वेळेला दुष्ट शक्ती आपल्या घरातील लोकांचा बचाव झाली आहे असे समजावे. मग ते खराब झालेला कोहळ कचरा मध्ये टाकून द्या आणि दुसरे नवीन घेऊन यावं आणि सांगितल्या पद्धतीने पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच्या दिवशी हे कोहळ आपल्या घरामध्ये बांधायचे आहे. सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने बांधावे.

पण तरीसुद्धा सोमवती अमावस्या ,शनि अमावस्या ,दिवाळी अमावस्या ह्यावेळी हे कोहळ नक्कीच बदलावे आणि कोहळ हे नेहमी सुर्यास्त नंतरच बांधावे. अशा सांगितलेल्या पद्धतीने आणि मुहूर्तावर जर आपण कोहळ आपल्या घराबाहेर मुख्य दरवाजामध्ये जर बांधलं तर दुष्ट शक्तीचा नाश होतो. चांगली शक्ती घरामध्ये येत असते. आपल्या घरातील लोकांमध्ये मतभेद होत नाहीत.

हे वाचा:   ज्या महिलेचे हे ५ अंग असतात खूपच मोठे त्या असतात खूप भाग्यशाली, जाणून घ्या.!

कोणालाही नजर लागत नाही, बाधा होत नाही आणि यातून आपल्या सगळ्यांचा बचाव होतो, रक्षण होते त्यासाठीच कोहळ घराच्या बाहेर बांधण्याची पद्धत आहे आणि या कोहळ्यामध्ये दुष्ट शक्तीचा नाश करण्याची एक मोठी ताकद असते असं आपलं पुराण सांगते.
पूर्वीच्या काळी दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी अशा पद्धतिने या कोहळ्याचा वापर केला जात असे. काही वेळेस त्या कोहळ्याचा ब ळी दिला जात असत.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.