घरात ठेवा या पाच वस्तू, स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले घरामध्ये सुख संपन्नता येण्यासाठीचे हे रहस्य.!

अध्यात्म

आपल्या कुटुंबामध्ये ऐक्य राहावे, कुटुंबातील सर्व व्यक्तींचे भले व्हावे, कुटुंबाचा आर्थिक उत्कर्ष व्हावा, कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आपलेपणा वाढावा, सर्व सदस्य गुण्यागोविंदाने एकत्र राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.

मात्र काही कारणांमुळे घरांमधील सदस्यांमध्ये वाद-विवाद व भांडणे होतात. स्वतः भगवान श्रीकृष्णाने घरामध्ये आपण काही वस्तू ठेवल्यामुळे सुख शांती व परिवारातील लोकांमध्ये सामंजस्य वाढते याबद्दल माहिती सांगितले आहे.

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या त्या पाच चमत्कारी वस्तुंबद्दल माहिती सांगणार आहोत ज्या वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये सौख्य नांदू लागते.

महाभारताच्या वेळी जेव्हा पांडव वनवास समाप्त करून हस्तिनापूराकडे परत जात होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सुखी-जीवनाकरता घरामध्ये पाच वस्तू ठेवण्याबद्दल माहिती दिली होती. ज्या वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते.

तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू.? ज्या घरात ठेवल्यामुळे घरांमध्ये धनसंपत्ती आणि आनंद निर्माण होतो.

चंदन – चंदन हे शुभ लक्षणाचे प्रतीक असते श्रीकृष्णाने सांगितले आहे की जर घरामध्ये चंदन असेल तर घरामध्ये कोणतीही वाईट शक्‍ती प्रवेश करू शकत नाही. चंदनाच्या सुगंधाने घरामध्ये सकारात्मकता वाढते. तसेच रोज चंदनाचा तिलक डोक्याला लावल्यामुळे मन शांत व तणावमुक्त राहत.

हे वाचा:   वास्तुशास्त्रानुसार घरात कचरा ठेवण्याची ही आहे योग्य जागा; लगेच पहा आणि बदल करा.!

पाणी – पाणी घरामध्ये येणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेला नियंत्रित करत असते, याकरता देवघरात किंवा स्वयंपाक घरात नेहमी  स्वच्छ पाण्याचा वापर केला पाहिजे. तसेच नेहमी स्वच्छ पाणी भरून ठेवले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने रोज सूर्याला अर्घ्य केले पाहिजे. तसेच घरात जर कोणी बाहेरचा व्यक्ती आला तर त्याला स्वच्छ पाणी द्यावे तो व्यक्ती आपला शत्रू का असेना पण त्याला पाणी द्यावे.

वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर बाथरूममध्ये नेहमी पाण्याची बादली किंवा टबमध्ये पाणी भरून ठेवले पाहिजे.कधीही रिकामे भांडे बाथरूममध्ये ठेवू नये.

मध – श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की घरामध्ये मध ठेवल्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरातील वातावरण शुद्ध राहते. एवढेच नव्हे तर मधाचे सेवन केल्यामुळे अनेक आजार होण्यापासून बचाव होतो.

गाईचे तूप – गाईचे तूप अतिशय पवित्र असते श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार गौमातेची सेवा केल्यामुळे देवता देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात. गाईचे तूप केवळ आपल्या आरोग्यकरताच लाभदायक नसते तर गाईचे तूप घरात ठेवल्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी देखील येते. दररोज गायीच्या तुपाचा दिवा घरामध्ये लावल्यामुळे घरातील सर्व क्लेश, दुःख व अडथळे दूर होतात. तसेच घरामध्ये सौख्य वाढते.

हे वाचा:   घरात कोहळ का बांधतात.? कोहळ लावण्याचे असतात हे चमत्कारी फायदे..घरासाठी खूप लाभदायक.!

वीणा – भगवान श्रीकृष्णाने घरामध्ये ठेवण्याची जी पाचवी वस्तू सांगितली आहे, ती म्हणजे वीणा!  वीणा हे विद्येची देवी सरस्वतीचे प्रिय वाद्य आहे. ज्या घरामध्ये वीणेची पूजा केली जाते त्या घरामध्ये नेहमी सुख-शांती नांदते. वीणा घरात ठेवल्यामुळे गरिबी, दरिद्रता, अपशकुन तसेच अज्ञानापासून मुक्ती मिळते. आपण आपल्या आवश्यकतेनुसार तसेच आपल्या ऐपतीनुसार छोटी किंवा मोठी वीणा घरात ठेवू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *