ऐश्वर्या राय सारखी दिसणारी ही पा’किस्तानी मॉडेल; अभिषेक देखील ओळखू शकणार नाही खरी ऐश्वर्या.!

मनोरंजन

एक ट्रिलियन म्हणजे एक लाख करोड इतकाच चांन्स असतो जेव्हा दोन व्यक्ती एक सारख्या दिसू शकतात. आपण कोठे जन्माला येतो , कसे दिसतो हे निश्चितच आपल्या हातात नाही, तसेच वर सांगितलेल्या चान्स नुसार, जर तुम्हाला कोणा सारखे दिसायचेच असेल, तर तुम्हाला कोणा सारखे दिसायला आवडेल?

हो! निश्चितच एखाद्या सेलिब्रेटी सारखे, एखाद्या विश्व सुंदरी सारखे दिसायला निश्चितच आवडेल, नाही का ? मग ती सेलिब्रेटी ही असेल आणि विश्वसुंदरी ही असेल तर! मेजवानीच ना!

सध्या सोशल मीडिया वर ‘आमना इमरान’ नावाच्या अश्याच एका मुलीची जोरदार चर्चा सुरु आहे. आणि त्याला कारण ही तसेच आहे. एक तर ही मुलगी दिसायला सुन्दर तर आहेच पण ती अगदी हुबेहूब विश्व सुंदरी आणि प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सारखी ही दिसते.

‘आमना’ सोशल मीडिया वर कायम ऍक्टिव्ह असते आणि ती जेव्हा ही तिचे फोटो शेअर करते तेव्हा तुम्ही गोंधळात पडाल हे मात्र निश्चित. ती अगदी हुबेहूब ऐश्वर्या राय बच्चन सारखी दिसते. ‘आमना इमरान’ ही एक पा’किस्तानी मॉडेल असून , सोशल मीडिया वर खूप ऍक्टिव्ह ही असते आणि ती नेहमी स्वतःला ऐश्वर्या राय बच्चन ची कार्बन कॉपी म्हणूनच प्रमोट करत असते.

हे वाचा:   महानायक बच्चन परिवारातील सून आणि मुलगी कसे आहेत दोघींचे संबंध.!

आमना स्वतः एक ब्युटी ब्लॉगर म्हणून काम करते. तिचे होठ आणि डोळे हे ऐश्वर्या राय शी इतके मेळ खातात की, तिचे फॅन्स ही नेहमी बुचकळ्यात पडतात की ही खरंच ‘आमना’ आहे की ऐश्वर्या रायचाच कुठला फोटो हिने शेअर तर नाही ना केला.

पण ऐश्वर्या राय बच्चन सारखे दिसणे किंवा ढोबळ मानाने ऐश्वर्या राय बच्चन ची डुप्लिकेट एव्हढीच काही ‘ आमना इमरान ‘ ही ची स्वतः ची ओळख नाही. ती स्वतः ब्युटी ब्लॉगर तर आहेच पण सोबत तिचे अनेक टिकटॉक व्हिडीओ सुद्धा तेव्हढेच वायरल होत असतात.

एक मात्र निश्चित आहे की ‘आमना इमरान’ आपले फोटो काढतांना एका गोष्टीवर खूप बारीक लक्ष देते आणि ते म्हणजे की ती त्या फोटोत ऐश्वर्या राय सारखी दिसत आहे की नाही. ती फोटोच अश्या प्रकारे काढते की ती ऐश्वर्या राय ची ‘कार्बन कॉपी’ दिसायला हवी.

हे वाचा:   डॅडी म्हणजे अरुण गवळी बनले आहेत आजोबा; जावई अक्षय वाघमारे व मुलगी योगिता गवळी यांना प्राप्त झाले कन्यारत्न...!

ऐश्वर्या राय बच्चन ही भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कोणाला ही भुरळ पडावे असे तिचे निळे डोळे. करोडोत तिची फॅन फॉलोविंग आहे. एक मात्र खरं की ऐश्वर्या राय अशी अभिनेत्री आहे जी तिच्या ‘हमशक्ल’ मुळे सुद्धा कायम चर्चेत असू शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *