डॅडी म्हणजे अरुण गवळी बनले आहेत आजोबा; जावई अक्षय वाघमारे व मुलगी योगिता गवळी यांना प्राप्त झाले कन्यारत्न…!

मनोरंजन

मुंबई मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला डॅडी म्हणजेच अरुण गवळी यांच्या विषयी माहिती आहेत. गेल्यावर्षी आठ मे रोजी अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी लग्नगाठ बांधली होती. कदाचित तुम्हाला माहिती नसेल योगिता गवळी ही अरुण गवळी यांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी चाहत्यांना एक गुड न्यूज शेअर केली होती. नुकताच दोघांना एक कन्यारत्न प्राप्त झाला आहे.

बाळाचा जन्म हा मुंबई येथील दादर मध्ये असलेल्या नर्सिंग होममध्ये झाला आहे. योगिता गवळी ही अरुण गवळी म्हणजेच डॅडी यांची मुलगी आहे. यावरून अरुण गवळी म्हणजेच डॅडी हे आता आजोबा बनले आहेत. कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक बापाला ज्याप्रमाणे आनंद होईल त्याच प्रमाणे अक्षयला देखील भयंकर आनंद झालेला आहे.

हे वाचा:   वयाने लहान अर्जुन ची ही गोष्ट खूप आवडली होती, म्हणून मलायका वयाचा विचार न करता थेट अर्जुन बरोबर रिलेशनशिप मध्ये राहू लागली...!

आनंदाच्या भरात अक्षय म्हणतो की, मला इतका आनंद झाला आहे की मी माझा आनंद शब्दात देखील मांडू शकत नाही. मी आज पासून माझा बाबा म्हणून चा प्रवास सुरू करणार आहे व त्यासाठी मी खूपच उत्सुक देखील आहे. बाळ आणि योगिता दोघेपण सुखरूप आहेत. या गोड बातमीमुळे आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये भरपूर आनंद झाला आहे. असं अक्षय म्हणतो आहे.

अक्षय आणि योगिता यांच्या परिवारामध्ये येणाऱ्या नवीन सदस्याचे ते खूपच सुंदर असे स्वागत करतील यात काही शंका नाही. तिघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *