आता चिंता करण्याची काहीच गरज नाही; कितीही घाम येऊ द्या अजिबात घाण वास येणार नाही.!

आरोग्य

जसा उन्हाळा सुरू होतो तशी शरीरामध्ये गर्मी आणखी वाढत जात असते. शरीराचे तापमान हे आणखी वाढत जात असते. खास करून उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. शरीरातून गर्मी बाहेर येताना आपल्या शरीराला खूप जास्त प्रमाणात घाम येत असतो. परंतु काही वेळा काखेमध्ये आलेल्या घामाचा खूपच वास येत असतो. घामाच्या दुर्गंधीमुळे आपल्याला अनेकदा अपमानित देखील व्हावे लागते.

तुमच्यासोबत आहे अशा प्रकारची ही घटना घडली असेल तर चिंता करण्याची काही गरज नाही, आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊया असे नेमकी का होत असते. यापासून कशा प्रकारे आपण सुटका मिळवू शकतो. आजच्या या लेखामध्ये आपण घामा संबंधीच्या या माहिती विषयी पूर्णपणे माहिती पाहणार आहोत. घामाचा वास का येत असतो तसेच येणाऱ्या घामाच्या वासावर काय उपाय आहे. सर्व सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे पाहूया.

घामाचा वास येणे हे आपल्या खाण्या-पिण्यावर तसेच आपल्याला असणाऱ्या सवयींवर अवलंबून असते. जेव्हा शरीरामध्ये पाण्यापेक्षा कॅफिन चे इंटेक होत असते आणि कधी कधी आपण दररोज अंघोळ करत नाही अशा प्रकारच्या या वाईट सवयी मुळे शरीरातून निघणार्‍या घामाचा खूपच भयंकर असा वास येतच असतो. डॉक्टरांकडून देखील असे सांगण्यात येते की घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण शरीराला काही काम सांगत असतो किंवा काही वर्काउट करून घेत असतो तेव्हा शरीरातून घाम बाहेर येणे हे सहाजिकच आहे.

हे वाचा:   या पदार्थांचे सेवन करणे म्हणजे हाडे आतमधून पोकळ करून घेणे, हाडांचे हे पदार्थ आहे दुष्मन.!

परंतु जेव्हा शरीरातून घाम बाहेर येत असतो तेव्हा आपल्या शरीरावरती अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असते. हे बॅक्टेरिया जेव्हा घामामध्ये एकत्र होत असतात तेव्हा याद्वारे खूपच दुर्गंधी येत असते, ज्याला आपण घामाचा वास येणे असे म्हणत असतो. अशा प्रकारच्या या घामाच्या दुर्गंधी पासून वाचण्यासाठी तुम्ही काही हे उपाय करायला हवेत. सर्वप्रथम आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. आपण कोणते अन्न खात आहोत ते आरोग्यासाठी चांगले आहे की नाही हे बघायला हवे.

दररोज अँटी फंगल पावडर चा उपयोग करावा. यामुळे घामाचा वास बराच कमी होत असतो. जेवताना आपल्या ताटामध्ये लसुन व कांद्याचा वापर कमी करावा. आपल्या अन्नपदार्थांमध्ये लसूण व कांदा याचा उपयोग खूपच कमी करावा. आपल्या भोजनामध्ये ताज्या फळांचा तसेच ताज्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यामुळे शरीराला प्रोटीन मिळत असते. उन्हाळ्यामध्ये खूप जाड कपडे घालू नये. कॉटन कपडे घालावेत जेणेकरून घाम येणार नाही.

हे वाचा:   महिलांसाठी खुशखबर.! केस लांबसडक बनवायचे असतील तर हे नक्की वाचा.! उंची पेक्षाही दुप्पट होतील केस.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *