सुंदरता ही अशी गोष्ट आहे जीची किंमत पैशापेक्षा देखील जास्त आहे. आजच्या या काळामध्ये प्रत्येकाला वाटत असते की आपण इतरांपेक्षा खूप श्रीमंत असावे त्याचप्रमाणे प्रत्येकाला असे देखील वाटत असते की आपण इतरांपेक्षा खूपच सुंदर दिसावे. असे खास करून महिलांना, मुलींना वाटत असते. तसेच असे काही पुरुष देखील असतात ज्यांना देखील आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. अशा वेळी हे लोक आपल्या सुंदरतेसाठी खूप पैसे खर्च करत असतात. परंतु काही घरगुती उपाय करूनही तुम्ही तुमची सुंदरता आणखी वाढवू शकता.
घरगुती उपायाद्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला आणखी सुंदर बनवू शकता. तुम्ही अतिशय सोपा असा फेसपॅक बनवून तुमच्या चेहऱ्याला लावला तर यामुळे तुमचा चेहरा आणखी खुलून जाईल. तसेच चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. चेहऱ्यावर फुटकुळ्या, फोड, काळे डाग, काळपटपणा असेल तर तो कायमचा नाहीसा होईल. तुमचा चेहरा मुलायम, गोरा, स्वच्छ, साफ व सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या लेखामध्ये आपण या उपायात बद्दल माहिती पाहूया.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वनस्पतीची गरज भासणार आहे परंतु चिंता करण्याची काहीही गरज नाही कारण ही वनस्पती प्रत्येकाच्या घरासमोर असतेच. जिला तुळस असे म्हटले जाते हो तुम्ही तुळशी द्वारे तुमच्या सौंदर्याला आणखी सुंदर बनवू शकता. यासाठी तुम्हाला तुळशीचा फेस पॅक बनवता यायला हवा. चला तर मग जाणून घेऊया कशाप्रकारे बनवला जातो तुळशीचा हा घरगुती तसेच आयुर्वेदिक फेस पॅक.
हा तुळशी चा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला तुळशीचे पंधरा ते वीस पाने लागतील तसेच पंधरा ते वीस कडुलिंबाच्या झाडाचे पाने देखील लागतील. यासोबतच काही थेंब लिंबाचा रस देखील लागेल. सर्वप्रथम कडुलिंबाच्या पानांना व तुळशीच्या पानांना स्वच्छ धुऊन घ्यावे व त्यानंतर मिक्सर मधून याला बारीक करून घ्यावे. बनलेली ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यावी. त्यानंतर यामध्ये थोडासा लिंबू रस टाकावा.
बनलेल्या या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर लावून ठेवावे. असे तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत तसेच ठेवायचे आहे. चांगल्या प्रकारे वाळल्यानंतर तुमचा चेहरा आत मध्ये ओढून धरल्यासारखे तुम्हाला जाणवेल. अश्यावेळी याला थंड पाण्याने धुऊन काढावे. त्यानंतर कोरड्या कपड्या द्वारे चेहरा पुसून काढावा. आठवड्यातून कमीत कमी एक वेळा हा उपाय करून बघावा. यामुळे चेहरा खूपच खुलून जात असतो.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.