उन्हाळ्याचा मोसम सुरू झाल्यानंतर आपल्याला हवी असते थंड हवा. अनेकदा आपण घरामध्ये पंखे सुरू करत असतो. परंतु फॅन द्वारे आपल्याला हवी तेवढी थंड हवा मिळत नाही. त्यामुळे आपण कूलर विकत आणत असतो. अनेकांच्या घरांमध्ये आधीपासूनच कूलर असते. काही कलर जुने झालेले असते त्यामुळे त्यातून थंड हवा बाहेर फेकली जात नाही. परंतु कुलरची आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर कुलर हे अगोदरच्यापेक्षा आणखी थंड हवा देईल यात काही शंका नाही.
कुलर हे असे उपकरण आहे जे उन्हाळ्याच्या काळामध्ये प्रत्येकाला हवेहवेसे वाटत असते. आपण जर या चार गोष्टींची काळजी घेतली तर कुलर कधीही खराब होणार नाही. तसेच कूलर कायमच थंड हवा देत राहील. आजच्या या लेखामध्ये आपण याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. हा लेख तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
जर कुलर ला पूर्णपणे व्हेंटिलेशन मिळाले तर कुलर चांगल्या प्रकारे कार्य करत असते. जर कुलर ला पूर्णपणे व्हेंटिलेशन मिळाले तर कुलर मधून इतकी थंड हवा येत असते की त्यामुळे तुम्हाला सहजपणे झोप देखील लागू शकते. कुलर ला योग्य असे व्हेंटिलेशन जर मिळाले तर 47 अंश सेल्सिअस मध्ये देखील कुलर एका रूमला थंड ठेऊ शकते.
कुलर मध्ये आपण पाणी टाकत असतो जेणेकरून कूलर मधून थंड हवा बाहेर फेकली जाईल. परंतु पाणी टाकत असताना एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी, पाण्यामध्ये कसल्याही प्रकारचा कचरा असू देऊ नये. कजरा असलेले पाणी कुलर मध्ये टाकल्यास यामुळे कुलर बिघडण्याची शक्यता असते. कधीही कुलर मध्ये पाणी टाकण्यापूर्वी चांगल्याप्रकारे गाळून घ्यावे.
कुलरच्या समोरच्या बाजूला आपण बघत असतो की थोडेसे गवत लावलेले असते. या गवताचे हे काम असते की पाण्याद्वारे थंड व्हावे व थंड हवा कुलर मध्ये सोडून ती समोर पास करावी. गवत हे पाण्यामुळे खूपच थंड होत असते. यामुळे जी हवा आत मध्ये येत असते ती खूपच थंड असते. त्यामुळे आपल्याला समोर खूपच थंड असा गारवा मिळत असतो. अनेक लोक वर्षानुवर्ष एकच घास तिथे लावत असतात परंतु दरवर्षी घास बदलणे खूप गरजेचे आहे.
अनेक लोक कुलर भरपूर काळापर्यंत सुरू ठेवत असतात परंतु काही काळानंतर कुलर बंद करून ठेवावे. सतत कूलर चालू ठेवल्यामुळे त्यामध्ये बिघाड निर्माण होण्याची शक्यता असते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.