फक्त एकच चमचा पुरेसा.! या सोप्या उपायाने भल्याभल्यांचे वजन केले आहे कमी.! आठवड्यात तीन चार किलो वजन सहज कमी होईल.!

आरोग्य

पोटाची चरबी वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. हार्मोनल बदलांमुळे शरीरातील चरबी एकाठिकाणी साठू न देण्यात हार्मोन्सची मोठी भूमिका असते. हार्मोनल असंतुलनामुळे भूक वाढू शकते, चयापचय क्रिया मंद देखील होऊ शकते आणि तणावाची पातळी वाढू शकते, ज्यामुळे पोटातील चरबी जमा होण्याची अनेकदा चिन्ह दिसून येतात.

आपल्या शरीराची चयापचय क्रिया कमी झाल्याने पुढे होणारे परिणाम गंभीर असतात. या सगळ्या गोष्टींमुळे चरबी कमी करणे आपल्यासाठी कठीण होते. या सारखे अनेक कारणांमुळे पोटाची चरबी वाढू शकते त्याचप्रमाणे आपण नेहमी बाहेरचे तेलकट तुप्पट पदार्थ खाल्यामुळे, जास्तीत जास्त गोड गोष्टींचे सेवन केल्यामुळे, पोटाची चरबी जास्त प्रमाणात वाढते.

असे जर व्हायचे नसेल तर आपल्याला आपल्या खाण्यावरती कंट्रोल असणे गरजेचे आहे. आपण जे काही पदार्थ खातो त्याची एक मर्यादा असली पाहिजे. जेव्हा आपल्या पोटाची चरबी वाढते तेव्हा जर आपण अनियमित व्यायाम केला नाही, डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर याचे रूपांतर एका भयंकर आजारामध्ये होऊ शकते त्यामुळे आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

या उपायाचे सेवन केल्यामुळे पोटाची चरबी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला जी गोष्ट इथे वापरायची आहे ती म्हणजे हिरडा. हिरड्याच्या सेवनाने शरीरातील तिन्ही दोष संतुलित राहण्यास मदत होते तसेच पोट साफ झाल्याने पचनशक्ती सुधारते.

आयुर्वेदानुसार हिरड्यामुळे शरीर अन्नपदार्थातील पोषणद्रव्ये अधिक चांगल्याप्रकारे ग्रहण करण्यास मदत करतात. अशा या बहुगुणी हिरड्याने शरीरातील वात कमी होतो, शरीर डिटॉक्स होते परिणामी वजन काबू राहण्यास मदत होते. या हिरड्याच्या सेवनामुळे पचन क्रिया व्यवस्थित पार पडते त्यामुळे आपले रोजचे खालेले अन्न आपल्याला व्यवस्थितरित्या पचायला मदत होईल म्हणूनच आपल्याला या हिरडाचा वापर इथे करायचा आहे.

हे वाचा:   चेहऱ्यावर कुठेही तीळ असूद्या.! एकदा उगळवून चेहऱ्याला लावा, तीन दिवसात होईल गायब.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरड्याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. त्यानंतरची गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे बडीशेप. बडीशेप देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. बडीशेप चा बाकी आजारांसाठी जेवढा वापर होतो त्यापेक्षाही जास्त वजन कमी करण्यासाठी बडीशेप चा वापर केला जातो. स्वादिष्ट चवीशिवाय बडीशेप खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

तज्ञांच्या मते, बडीशेप हे असेच एक सुपरफूड आहे जे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यात मदत होते. म्हणूनच इथे आपल्याला बडीशेप चा वापर करायचा आहे. बडीशेप कोणत्याही प्रकारची असेल तरीही चालेल जाड बारीक कोणत्याही प्रकारची बडीशेप असेल तरी देखील चालेल.

त्यामुळे इथे आपल्याला दोन चमचे बडीशेप घ्यायची आहे. तिसरी आणि शेवटची गोष्ट आपल्याला येथे वापरायची आहे ते म्हणजे जिरे. जिरे देखील आपल्या शरीरासाठी गुणकारी असते. जिरे हे आपल्या शरीरातील खाल्लेले जेवण पचवण्याचे काम करते. ऍसिडिटी असेल तर जिऱ्याच्या सेवनाने आपल्याला कधीही ऍसिडिटी होत नाही म्हणून आपल्याला इथे जिराचा वापर करायचा आहे.

त्यामुळे जेवढ्या प्रमाणात आपण बडीशेप चा वापर करणार आहोत. तेवढ्याच प्रमाणामध्ये जिरे घ्यायचे आहे म्हणजेच दोन चमचे जिरे आपल्याला इथे वापरायचे आहे म्हणूनच गॅसवर एक पात्र ठेवून जिरे व बडीशेप आपल्याला पाच मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ती थंड झाल्यावर त्याची बारीक पूड तयार करायची आहे. ही पूड थंड झाल्यावर एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा हिरडा पावडर टाकायची आहे.

हे वाचा:   आता अंथरुणावर खीळलेला सुद्धा उठून पळू लागेल.! हे लावतात क्षणी पायापासून केसापर्यंत सर्व शरीरातील झिनझिण्या.! शरीरातल्या 72000 नसा होतील मोकळ्या.!

या तिन्ही प्रकारच्या पावडरला एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आता ही पावडर आपण पंधरा दिवसांसाठी वापरू शकतो त्यामुळे तुम्ही जेवढा दिवस याचा वापर करणार आहात तेवढे दिवसांची पावडर तुम्ही एका डब्यामध्ये बंद करून ठेवू शकता. आता याचे सेवन आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी करायचे आहे.

झोपण्यापूर्वी एक चमचा पावडर तुम्हाला खायची आहे. जर ही पावडर तुम्ही अशीच खाऊ शकत नसाल तर एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात ही पावडर टाकून आपल्याला प्यायची आहे. असे दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे. एका आठवड्यामध्येच आपल्याला हा झालेला फरक दिसून येईल. आपल्या पोटाची चरबी हळूहळू कमी व्हायला लागेल, एवढेच नाही तर जेवण पचायला देखील मदत होईल.

जर रात्री वेळ मिळत नसेल तर दररोज सकाळी देखील याचे सेवन तुम्ही करू शकता पण शक्य असेल तर रात्रीच याचे सेवन करावे हा उपाय करताना तथ्य देखील पाहणे गरजेचे आहे, जसे की बाहेरील तूपट, तेलकट पदार्थांचे सेवन करू नये त्याचबरोबर गोड पदार्थांचे सेवन टाळावे. जर या गोष्टी खात असाल तर त्याचे प्रमाण थोडे कमी करावे त्याचबरोबर थोडासा व्यायाम देखील करावा व दिवसात भरपूर पाण्याचे सेवन करावे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.