गवतासारखी दिसणारी ही वनस्पती आहे खूपच गुणकारी; ऋतु बदलामुळे आलेला ताप झटकन बरा होईल.!

आरोग्य

आपल्या निसर्गामध्ये बर्‍याच औषधी वनस्पती आढळतात, ज्याचा उपयोग प्राचीन काळापासून अनेक रोग दूर करण्यासाठी केला जात आहे. अनेक काळापासून प्राणिसृष्टी तिच्या दररोजच्या गरजा भागविण्यासाठी वनस्पतींवर अवलंबून राहात आहे. एकूण जीवसृष्टीमध्ये वनस्पतीच स्वयंपूर्ण आहेत. वनस्पती आहेत म्हणून आपण आज जगू शकतो. झाडांमुळे प्राणवायू मिळतो. आपल्याला तर अनेक उपाय आणि वापर अनेक वनस्पतींचा माहीतच असतो.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशाच एका वनस्पतीविषयी सांगणार आहोत, जे औषधी वनस्पतींपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे, म्हणून त्यास फक्त गवत समजून दुर्लक्ष करू नका. शेतातील लागवडीखालील मुख्य पिकात दुसऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष लागवड न केलेल्या परंतु उगवून आलेल्या वनस्पतींना तण असेच म्हणतात. ‘अनावश्यक वाढणारी वनस्पती’ अशी तणाची सोप्या भाषेत व्याख्या करता येईल. आज आम्ही अशीच एका तणांची माहिती घेऊन आलो आहोत.

आम्ही ज्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत त्याचे नाव आहे नागरमोथा. ही एक अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे. भारतात मध्य प्रदेशातील वनांत ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. नागर मोथा याला काही जण लव्हाळा या नावाने देखील ओळखतात. नागरमोथ्याच्या बारीक खोडाला काही ठिकाणी उभट, लंबगोलाकार कंद येतात. त्यातून एक सुवासिक घटक निघतो. यात स्निग्ध आम्ले असल्यामुळे त्यास सुगंध येतो. या तेलाचा वापर सुवासिक उटणी, साबण किंवा अत्तरे बनवण्यासाठी सुद्धा केला जातो.

हे वाचा:   अंडी खाणाऱ्या बऱ्याच लोकांना गावरान अंडी, बॉयलर अंडी आणि आर आर अंडी काय असते माहित नाही.! यामध्ये असतो हा फरक.!

नागरमोथ्याच्या मुळास छोटा कंद असतो. हा कंद मसाल्याचा एक भाग म्हणून देखील वापरतात. ही वनस्पती मासिक पाळीच्या अनियमिततेच्या समस्यांवर मात करण्यासाठी वापरली जाते. या समस्येवर मात करण्यासाठी नागरमोथाचा रस दिवसातून दोनदा नियमितपणे सेवन करावा लागतो. नागरमोथा हे एक सुगंधी औषध आहे. घाम आणि लघवीची दुखणी ह्यावर ह्याचा उत्तम उपयोग होतो. ह्याच्या सुगंधी गुणामुळे कृमीनाशक म्हणूनही हे औषध काम करते.

नागरमोथ्याच्या कंदांची आणि मुळांची पूड त्वचादोषांवर गुणकारी असल्याचे मानले जाते. त्वचेला सुटणारी खाज, कंड, त्वचेवरील पुरळ इत्यादी त्वचाविकारांवर हे अतिशय फायदेशीर आहे. नाकातून रक्त वाहत असल्यास नागर मोथ्याचा उपयोग केला जातो. नागर मोथा हे भूक वाढवण्यासाठी तसेच पोटा संबंधित आजार बरे करण्यासाठी देखील वापरले जाते. वातदोषामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. बाळाला दूध देणाऱ्या महिलांना सुद्धा याचा फायदा होतो. यामुळे दुध वाढण्यास मदत होते.

हे वाचा:   डायबिटीज झाला असेल तर, हे पदार्थ शंभर टक्के खायला हवे.! शुगरच्या पेशंटसाठी या गोष्टी आहेत खूप मोठे वरदान.!

जास्त ताप असल्यास सुद्धा नागर मोथा वापरला जातो. त्याचा रस करून ताप येणाऱ्या व्यक्तींना द्यावा. त्याशिवाय सर्दीसारख्या समस्या दूर करण्यासाठी नागरमोथाची पेस्ट बनवा आणि एक चमचे दिवसातून दोन किंवा तीन वेळा घ्या. हे आपल्या सर्दी आणि सर्दीसारखे आजार लवकर बरे करते. नागरमोथा दम्याच्या उपचारात देखील वापरला जातो. दम्याशी संबंधित आजारापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला नगरमोथाचा रस घ्यावा लागेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *