संक्रमणामुळे घशामध्ये कधी त्रास होऊ लागला तर या तीन उपायांपैकी एक उपाय पटकन करावा, खात्रीशीरपणे फायदा होईल…!

आरोग्य

अनेकदा गळ्यामध्ये खूपच इन्फेक्शन झाल्यामुळे आपल्याला खूपच अस्वस्थ झाल्यासारखे वाटत असते. अनेकदा सर्दी झाल्यामुळे तसेच खूपच खोकला झाल्यामुळे घसा आत मधून लाल होत असतो. अनेकदा कॉमन कोल्ड आणि फ्लूच्या संक्रमण कारणामुळे खूपच त्रासदायक असा आपला घसा दुखत असतो.

 

घशामध्ये त्रास होऊ लागला की सर्वात प्रथम आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की हा त्रास कशामुळे होत आहे. हा त्रास अनेकदा ड्राय एयर, धू’म्र’पा’न, ॲसिड रिफ्लक्स इत्यादी सारख्या सामान्य कारणांमुळे देखील जाणवू लागत असतो. सामान्यतः वायरल संक्रमणामुळे गळ्यामध्ये त्रास होऊ लागतो यामुळे घशातल्या मांसपेशी मध्ये त्रास होण्यास सुरुवात होतो यामुळे खूपच थकवा आल्यासारखे वाटत असते.

 

इन्फेक्शन होऊ लागल्यानंतर घसा आणखी लालबुंद होऊ लागतो व त्रास देखील आणखी वाढत जात असतो. अशाप्रकारे घशा संबंधीच्या कोणत्याही समस्या उद्भवू लागल्या नंतर आपण त्वरित काही सोपे असे घरगुती उपाय करून बघायला हवेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला घशासंबंधी चे असे काही सोपे उपाय सांगणार आहोत जे उपाय तुम्ही घरच्या घरी अगदी सहजपणे करू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

हे वाचा:   ज्या लोकांना सतत पित्त होते त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती.! ही एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा.! पित्त, जळजळ, तोंड कडवट पडणे होईल कायमचे बंद.!

 

१. मिठाच्या पाण्याचा सोपा उपाय:

घशासंबंधी ची कोणतीही समस्या असो त्याला सर्वात सोपा व अगदी सहजपणे केला जाणारा उपाय म्हणजे मिठाचे पाणी याद्वारे केल्या गेलेल्या गुळण्या. मिठाचे पाणी हा त्रास अगदी सहजपणे नष्ट करत असते. यामुळे घशामध्ये असलेला कफ देखील वितळून बाहेर येत असतो. कधीही अशा प्रकारची समस्या उद्भवल्यास हा सोपा उपाय करायला हवा.

 

२. मधाचा उपाय: 

मध याला आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे औषध मानले जाते. मधामुळे अनेक शारीरिक समस्या नाहीशा होत असतात. मध आपल्याला व्हायरल संक्रमणाची लढण्यासाठी मदत करत असतो. जर तुम्हाला घशा संबंधीची कोणतीही समस्या असेल तसेच खोकल्यामुळे घसा लालबुंद झाला असेल तर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून याचे सेवन करावे यामुळे नक्कीच आराम मिळेल.

हे वाचा:   कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याआधी एकदा लावा.! सर्वात सुंदर आणि गोरा चेहरा तुमचाच दिसेल.! चारचौघात सुंदर दिसण्यासाठी नक्की करा.!

 

३. लिंबू ठरेल खूपच गुणकारी:

ज्याप्रमाणे मिठाचे पाणी व मध घशासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो त्याचप्रमाणे लिंबू देखील खूपच गुणकारी मानले जाते. लिंबाच्या सेवनामुळे घशामध्ये असलेला सर्व कफ काही वेळातच बाहेर येत असतो. याचे सेवन थोड्याशा गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा लिंबूचे रस टाकून करावे.

 

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

 

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *