सध्या आजाराचा काळ सुरू आहे. अनेक प्रकारचे लहान-मोठे आजार होत असून याचा त्रास खूपच भयंकर असा होत आहे. शरीरामध्ये आजार होण्याचे कारण असतात आपण योग्य तो आहार घेत नाही. योग्य असा पौष्टिक आहार न घेतल्यामुळे शरीराला अनेक हानिकारक आजारांचा सामना करावा लागत असतो. अशातच सर्दी-खोकला, ताप, नाक गळणे, छातीमध्ये कफ होणे अशा लहान-मोठ्या समस्या निर्माण होत असतात.
अनेकदा सर्दी झाल्यामुळे किंवा खोकल्यामुळे छातीमध्ये खूपच जास्त प्रमाणात कफ साचला जातो. आपण याकडे एवढे लक्ष देत नाही परंतु यामुळे श्वसनास संबंधीचे विकार होण्याचे खतरा सांगितला जातो. अनेकदा हा छाती मध्येच चुकला जातो यामुळे अनेक व्हायरल बॅक्टेरियल संसर्गाची शक्यता निर्माण होत असते. छातीमध्ये साचलेला सर्व कफ बाहेर पडणे खूप गरजेचे असते. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला छाती मधला कफ मोकळा करण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
अद्रक हे शरीरासाठी खूपच उत्तम मानले जाते. अनेक लहान सहान आजार झाल्यानंतर याचा चहा मध्ये वापर केला किंवा अद्रकाचा काढा बनवून पिल्यास भरपूर असा आराम मिळत असतो. अद्रका मध्ये अनेक अँटीवायरल गुण असतात. याच्या सेवनामुळे छातीमध्ये जमा झालेला सर्व कफ बाहेर येत असतो. शक्य झाल्यास अद्रकाचा काढा बनवून प्यावा. परंतु अद्रक चहा मध्ये टाकून देखील सेवन करता येऊ शकते.
लसणाला गुणांची खाण म्हटले जाते. कारण लसुन हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. आयुर्वेदामध्ये याला खूप महत्त्व दिले गेले आहे कारण लसून शरीरामध्ये अनेक प्रकारचे फायदे घडवून देत असतो. यामध्ये अनेक गुणधर्म असतात याद्वारे छातीमध्ये साचलेला कफ अगदी सहजपणे बाहेर काढला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त लसणाचा वापर करायला हवा.
जर कधी सर्दी, खोकला, गळ्यामध्ये इन्फेक्शन, छातीमध्ये कफ किंवा कमी प्रतिकारशक्ती असेल अशा प्रकारच्या समस्या असेल तर यासाठी कांदा खूपच उपयुक्त ठरू शकतो. कांद्याचे सेवन कशा प्रकारे करावे तर सर्वप्रथम थोडासा कांदा चिरून तो पाण्यामध्ये भिजू घालावा काही वेळा पर्यंत भिजवलेला हा कांदा याचे पाणी घ्यावे व त्यामध्ये काही थेंब लिंबूरस टाकावा. यापासून अनेक फायदे होत असतात सर्दी, खोकला, छाती मधला कफ देखील मोकळा होतो.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.