मासे हे आपल्या आरोग्यासाठी एक अतिशय उत्तम असलेले मांसाहारी अन्न आहे. माशांमध्ये असे अनेक पौष्टिक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. असे अनेक आजार आहेत जे माशाच्या सेवनामुळे बरे होतात किंवा कमी होत असतात. मासे सेवन करताना आपण काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
मासे खात असताना काही गोष्टींबरोबर काही असे पदार्थ आहे त्यांच्याबरोबर मासे एकत्र पद्धतीने सेवन केले तर यामुळे अनेक भयंकर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. जेव्हा आपण घरामध्ये मासे बनवले जातात तेव्हा तुम्ही अनेकदा ऐकले असेल की मासे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नको असे आपल्याला नेहमीच सांगितले जात असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की खरंच मासे व दूध च्या सेवनामुळे शरीराला गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात का?
आयुर्वेदामध्ये देखील मासे खाल्ल्यानंतर दूध पिणे व दूध पिल्यानंतर मासे खाणे याला खूपच नुकसानदायक मानले गेले आहे. असे केल्याने अनेक घातक अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अगोदर मासे खाल्ले व त्या नंतर दुध पिले तर यामुळे ल्युकोडर्मा होण्याची शक्यता असते. ल्युकोडर्मा हा एक त्वचा संबंधीचा आजार आहे. या आजारामध्ये त्वचावर एक छोटासा पांढऱ्या रंगाचा डाग निर्माण होतो व हळूहळू संपूर्ण शरीरावर वाढत जात असतो.
आयुर्वेदामध्ये दुधाबरोबर अनेक असे पदार्थ आहेत ज्यांना खाण्यापासून सक्त मनाई केली गेली आहे. दुधाबरोबर केवळ मासेच नाही तर असे अनेक पदार्थ आहेत ज्यांचे एकत्र पद्धतीने सेवन करणे खूपच घातक मानले जाते. जर कधी आपण उडीद डाळ खाल्ली तर त्यानंतर कधीही दूधाचे सेवन करू नये. असे करणे खूपच घातक मानले जाते.
दुधासोबत दह्याचे सेवन देखील केले नाही पाहिजे. जर कधी दुधासोबत दह्याचे एकत्र पद्धतीने सेवन केले तर यामुळे त्वचा संबंधीचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. दुधाबरोबर तीळ खाणे देखील घातक असल्याचे सांगितले जाते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.