उचकी लागणे बंद होणार केवळ एका मिनिटात; उचकी लागायला लागली की फक्त ही एक गोष्ट करायची.!

आरोग्य

अनेकांना उचकी लागणे ही प्रक्रिया खूपच त्रासदायक ठरत असते. परंतु ही उचकी लागण्याची प्रक्रिया आहे ही खूपच नैसर्गिक अशी प्रक्रिया आहे. परंतु यामुळे अनेकांना त्रास देखील सहन करावा लागत असतो. अनेकांना खुपच जास्त प्रमाणात उचकी लागत असते. अनेक जण शोधत असतात की उचकी थांबण्यासाठी काय उपाय करायला हवेत, तर उचकी थांबवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून उचकी ला सहजपणे थांबवू शकता.

तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींना जर उचकी लागत असेल किंवा एखाद्या वेळी उचक्या लागायला लागल्या तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघू शकता. या उपायाद्वारे तुमची उचकी केवळ एका मिनिटात थांबेल यात काही शंका नाही.

तर या उचकीसाठीचा सर्वात पहिला असा उपाय आहे म्हणून, पाणी पिणे उचक्या लागू लागल्या तर, जितके शक्य होईल तितके जास्त पाणी प्यावे पाणी पिल्यामुळे उचकी थांबत असते. अनेक जण हा उपाय करून आपली उचकी थांबवत असतो. परंतु काही लोकांना उचकी खूपच जास्त प्रमाणात येत असते कितीही पाणी पिले तरी ही उचकी थांबत नाही.

हे वाचा:   आज मिळणार प्रश्नाचे उत्तर.! सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याने शरीरात नेमके होते तरी काय.?

तर अशा या लोकांसाठी दुसरा उपाय नक्की फायदेशीर ठरेल. उचकी लागत असेल आणि पाण्याने काही होत नसेल तर यासाठी एक काम करावे चमचाभर साखर पटकन तोंडात टाकावी. चमचाभर साखर खाल्ल्यानंतर पाच ते दहा मिनिटानंतर पाणी प्यावे. चमचाभर साखरेमुळे तुमची उचकी 100% थांबेल.

जर हे दोन्ही उपाय केले तरी देखील उचकी थांबत नसेल तर मग तुम्ही हा तिसरा उपाय करून बघायला हवा. उचकी थांबवण्यासाठीचा हा तिसरा उपाय असा आहे की, यासाठी तुम्हाला एक मोठा श्वास घ्यायचा आहे. हा जो घेतलेला मोठा श्वास आहे तो जेवढा वेळ होईल तेवढा वेळ रोखून धरायला आहे. अनेकांच्या डोक्यामध्ये आता हा प्रश्न आला असेल की श्वास रोखून धरल्याने काय होईल.?

हे वाचा:   युवकांमध्ये हार्ट अटॅक चे प्रमाण म्हणून वाढले जात आहे, हे आहे यामागील किळसवाणे सत्य.!

तर असे केल्याने तुमच्या फुफ्फुसामध्ये कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण आणखीन वाढेल व तुम्हाला उचकी लागणार नाही. अशा प्रकारच्या या उपायाद्वारे तुम्ही तुमच्या उचक्या सहजपणे थांबवू शकता. जर तुमच्या घरामध्ये कोणाला अशाप्रकारे उचक्या लागत असेल तर तुम्ही हे उपाय त्यांना सांगू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *