सर्दी होणे, खोकला होणे, नाक बंद होणे, थोडीशी ताप येणे यांसारख्या लहान-सहान समस्या ह्या सुरूच असतात. डॉक्टर द्वारे तर असे सांगितले जाते की वर्षभरातून प्रत्येक व्यक्तीला दोनदा-तीनदा सर्दी होतच असते. सर्दी होण्यामागे अनेक कारणे आहेत, काही लोकांना तर ऍलर्जीमुळे देखील सर्दी होत असते म्हणजे धुळे संबंधीची असल्याने देखील सर्दी होत असते. असे लोक धुळी मध्ये गेले तर त्यांना लगेच काही सेकंदात सर्दी होते.
सर्दी झाल्यानंतर माणूस खूपच घायाळ होत असतो, कारण नाकातून सतत येणारे पाणी व त्यामुळे होणारी डोकेदुखी खूपच भयंकर असा त्रासदायक अनुभव हा सर्दी झाल्यावर होत असतो. अशा वेळी आपण डॉक्टरांकडे न जाता वेगवेगळे उपाय घरगुती पद्धतीने करून बघत असतो. परंतु काही न करता देखील एक ते दोन आठवड्यामध्ये सर्दी आपोआप बरी होत असते. जर तुम्हाला परत परत सर्दी खोकल्या यांची समस्या निर्माण होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणे देखील खूप गरजेचे असते.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सर्दी संबंधित खूपच महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. सर्दी झाल्यानंतर आपण आपल्या खाण्यापिण्याकडे देखील खूप लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सर्दी झाल्यानंतर कोणत्या गोष्टी खाव्यात व कोणत्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करावे याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग या बाबत आपण सविस्तरपणे माहिती पाहूया.
लसणामध्ये जीवाणू विरोधी गुणधर्म असतात आयुर्वेदामध्ये लसणाला खूपच महत्त्व दिले गेले आहे. लसणाला विशिष्ट गुणांची खाण म्हटले जाते कारण यामध्ये भरपूर गुणधर्म असतात जे वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरत असतात. लसूण हा पदार्थांमध्ये टाकून किंवा एखादे सूप बनवून पिल्यास सर्दीवर खूपच चांगला आराम मिळत असतो. यामुळे ब्लड प्रेशर सारख्या आजारावर देखील आराम मिळत असतो.
आजारी पडल्यानंतर सर्वात प्रथम आपण हिरव्या पालेभाज्या तसेच काही फळांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. पालक पत्ताकोबी यांसारखे भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला हवे तेवढे पौष्टिक तत्व मिळतात व यामुळे आजार देखील बरे होण्यास मदत होत असते. पोस्टीक आहार घेतल्यामुळे आजाराशी लढण्याची ताकद म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढली जात असते त्यामुळे आजारी पडल्यानंतर पौष्टिक आहार घेणे देखील खूप गरजेचे असते.
सर्दी झाल्यानंतर काही पदार्थ अजिबात खाऊ नये. सर्दी झाल्यावर कधीही तेलकट पदार्थ खाऊ नये तेलकट पदार्थांमुळे सर्दी आणखी वाढली जात असते तसेच घशामध्ये देखील आणखी इन्फेक्शन होत असते. सर्दी झाल्यावर भात केळी हे देखील खाऊ नये यामुळेदेखील सर्दी आणखी वाढत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.