सध्याच्या काळामध्ये वजन कमी करणे हे अनेक लोकांचे स्वप्न बनले आहे. कारण कितीही प्रयत्न केले तरी वाढलेले वजन हे कमी होत नसते. परंतु लोक याकडे खूपच गांभीर्याने लक्ष न देता वेगवेगळे उपाय करून बघत असतात. अनेकदा वजन वाढलेले लोक हे सकाळच्या वेळी जिम मध्ये वेगवेगळे व्यायाम करताना दिसत असतात. व्यायाम करूनही वजन कमी होत असते.
परंतु काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे आहे तरच याचा पूर्ण प्रभाव हा शरीरावर दिसून येत असतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा नियम असतो तो म्हणजे आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे. आपण किती अन्न खातोय त्या खाण्यामध्ये किती कॅलरी आहे याकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढ होत असते.
अशा वेळी अनेकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल की आपण दिवसभरामध्ये किती अन्न खावे तसेच दिवसभरात किती चपात्यांचे सेवन करायला हवे. तर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर पणे माहिती सांगणार आहोत. वजन कमी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने दिवसभरामध्ये किती चपात्या खाव्या हे सविस्तरपणे पाहूया.
भारतीय खाद्यसंस्कृती मध्ये चपाती हे मुख्य अन्न बनले आहे कोणतेही जेवण असो त्यामध्ये चपाती ही असतेच. भारतीय खाद्यसंस्कृती मध्ये चपाती चे जास्त प्रमाणात सेवन केले जात असते. तर एखादी नॉर्मल आकाराची चपाती असेल तर त्या चपाती मध्ये 4 ग्रॅम प्रोटीन, 17 ग्रॅम फायबर, 20-25 ग्रॅम कार्बोहाइड्रेट. अनेक लोकांना माहिती नसेल परंतु कार्बोहाइड्रेट हे दोन प्रकारचे असतात.
पहिले म्हणजे सिम्पल कार्बोहाइड्रेट व कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट. जे पहिले सिम्पल कार्बोहाइड्रेट असतात त्याचे खूप जास्त असे चान्सेस असतात जे थेट फॅट मध्ये कन्व्हर्ट होत असतात. याउलट जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात याचे खूपच कमी चान्सेस असतात फॅट मध्ये कन्वर्ट होण्याचे. जे चपाती मध्ये कार्बोहाइड्रेट असतात त्यामध्ये हेच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात.
आता अनेकांच्या डोक्यामध्ये आले असेल की चपाती मध्ये खूपच कमी आहेत असलेले कार्बोहायड्रेट असतात त्यामुळे आपण कितीही चपातीचे सेवन करू शकतो परंतु असे नसते. एखादी व्यक्ती खूपच बारीक असेल अशा व्यक्तीने कितीही अन्न सेवन केले तरी ती व्यक्ती जाड होत नसते. याउलट एखाद्या जाड व्यक्तिने थोडे जरी जास्त खाल्ले तरी त्याचे फॅटमध्ये रूपांतर होत असते. हे सर्व मेटाबोलिजम वर अवलंबून असते.
ज्या व्यक्तींना खरोखरच आपले वजन कमी करायचे असेल अशा लोकांनी आपल्या दुपारच्या जेवणामध्ये दोन चपाती व रात्रीच्या जेवणामध्ये एक चपाती असा सामावेश करावा. रात्रीचे जेवण ते नेहमी कमीच ठेवावे. रात्रीच्या वेळी कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमीच असले ते तितकेच चांगले असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.