चिकन बिर्याणी बनवताना हे एक छोटेसे काम करा.! बिर्याणी जबरदस्त टेस्टी होईल.! हॉटेलचे जेवण यासमोर फिके पडेल.!

आरोग्य

आपल्यापैकी काही जण मांसाहारी असतील तर त्यांना बिर्याणी खायला आवडत असेलच. चिकन बिर्याणी ही जवळपास प्रत्येकाच्याच आवडीची असते. त्यामुळे ती सर्वांनाच खायला आवडते. पण दररोज बिर्याणी बाहेरून मागवणे म्हणजे आपल्याला त्यासाठी अनेक पैसे खर्च करावे लागत असतात म्हणूनच आज आपण बिर्याणी बनविण्यासाठी असा एक घरगुती प्रकार पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरबसल्या स्वतः चवदार आणि भरपूर स्वादिष्ट अशी बिर्याणी बनवू शकता.

बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला दररोजच्या जेवणात लागणारे काही गोष्टी घ्यायच्या आहेत. ज्या आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध होत असतात, चला तर मग जाणून घेऊया ही बिर्याणी बनविण्यासाठी आपल्याला कोणकोणती सामग्री लागणार आहे आणि बिर्याणी बनविण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. सर्वप्रथम आपल्याला एक कढई घ्यायची आहे. कढई गॅसवर ठेवून त्यावर दोन चमचे तेल टाकायचे आहे.

त्यानंतर चार लसूणच्या पाकळ्या आणि चार तुकडे आले एकत्रित यामध्ये टाकून भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये कमीत कमी सहा ते सात काजू टाकायचे आहेत. आले आणि लसूण सोबत काजूचे गर देखील आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये दोन ते तीन कापून घेतलेले टोमॅटो टाकायचे आहे आणि यांना भाजून घ्यायचे आहे. हे पदार्थ आपल्याला जास्त भाजायचे नाही आहे पण थोडेफार भाजून घ्यायचे आहे.

आता हे संपूर्ण मिश्रण एकत्रितपणे भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये अजून दोन चमचे तेल टाकायचे आहे आणि या तेलामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा काश्मिरी लाल मिरची आणि एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा हळद टाकून हा मसाला मंद आचेवर थोडा वेळ शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जेवढे चिकन हवे आहे तेवढे चिकन धुऊन घ्या.

मसाल्यामध्ये टाकून फ्राय करायला सुरुवात करायची आहे. आता हे चिकन या मसाल्यांमध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून भाजत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे चिकन शिजत ठेवायचे नाही आहे तर सारखे चमच्याने त्याला हलवत राहायचे आहे, जेणेकरून आपल्याला हेच चिकन व्यवस्थित संपूर्णरित्या शिजवून मिळेल. या चिकनला जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटे भाजायचे आहे.

हे वाचा:   चेहऱ्याला कधीही म्हातारे होऊ देणार नाही हे फुल.! जादुई फुल चेहरा बनवेल आणखी तरुण.! एकदा नक्की वाचा.!

गॅस थोडासा मोठा करून देखील तुम्ही चिकन भाजून घेऊ शकता एकदा काही चिकन भाजून झाले की आपल्याला परत एकदा हे एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे. आता आपण सर्वप्रथम जो टोमॅटो काढून घेतला होता. तो थंड झाला असल्यास मिक्सरला लावून त्या सर्व मिश्रणाची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. ती पेस्ट तशीच ठेवायची आहे.

दुसरीकडे त्याच कढईमध्ये चिकन काढून झाल्यानंतर परत एकदा एक वाटी तेल टाकायचे आहे आणि यामध्ये चार ते पाच कापून घेतलेले कांदे हळूहळू भाजून घ्यायचे आहे. थोडासा कांदा भाजल्यानंतर म्हणजे कांद्याला सोनेरी रंग आल्यावर हा कांदा आपल्याला गाळून एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे.

त्यासाठी त्याच तेलामध्ये एक चमचा जिरे आणि दालचिनीची पाने टाकून ती मंद आचेवर भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये काळी मिरी टाकून आणि वेलची टाकून हे सर्व गोष्टी त्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. या गोष्टी व्यवस्थित रित्या मंद आचेवर भाजून झाल्यावर त्यामध्ये चार ते पाच कापून घेतलेले कांदे टाकायचे आहेत आणि परत एकदा हे कांदे शिजवून घ्यायचे आहेत.

हे कांदे व्यवस्थित भाजून झाल्यावर यामध्ये आपल्याला टोमॅटोची बनवून घेतलेली बारीक पेस्ट टाकायची आहे. त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा काश्मिरी लाल मिरची एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने मसाला टाकून हे मिश्रण व्यवस्थित रित्या शिजवून घ्यायचे आहे. एकदा का हे संपूर्ण मिश्रण शिजल्यानंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेले चिकन टाकायचे आहे आणि ते देखील आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे.

यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ देखील टाकायचे आहे मिठाचा वापर आपण सर्वप्रथम चिकन भाजताना केलेला असल्यामुळे इथे कमी प्रमाणात मिठाचा वापर करायचा आहे म्हणजेच चवीनुसार मीठ घ्यायचे आहे. हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर कांदा टाकल्यामुळे याला थोडेसे पाणी सुटेल आणि हे व्यवस्थित मसाला तयार होईल.

हे वाचा:   अनेक वर्ष जुन्या असलेल्या गजकर्णला एका झटक्यात बरे करा.! करल्यातला कडूपणा असा करायचा वापर.!

त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरा पावडर टाकून आपल्याला परत एकदा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आणि याला 15 मिनिटे शिजू द्यायचे आहे जेणेकरून यामधील चिकन व्यवस्थित शिजवून तयार होईल. तोपर्यंत आपण भात शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला एका मोठ्या टोपामध्ये किंवा एका पात्रामध्ये अर्धे पात्र भरून पाणी घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहे.

आपल्याला दोन तुकडे दालचिनीची साल आणि दोन वेलची टाकून पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचे आहे आणि थोडेसे मीठ देखील यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर धुऊन घेतलेला बासमती तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि हा तांदूळ एशी टक्के शिजवून घ्यायचा आहे. मंद आचेवर हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. एंशी टक्के तांदूळ शिजवून झाल्यावर त्याला एका प्लेटमध्ये गाळून वेगळा करून घ्यायचा आहे आता जे चिकन आपण शिजण्यासाठी ठेवले होते ते पाहायचे आहे.

ते शिजवून तयार असल्यास त्यातील अर्धे चिकन आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचे आहे आणि अर्धे चिकन तसेच प्लेटमध्ये ठेवायचे आहे. आता खाली अर्धे चिकन ठेवलेले आहे त्यावर आपला तयार झालेला भात थोडासा टाकून एक भाताची पातळी तयार करायची आहे. त्यावर थोडासा कढीपत्ता आणि सुरुवातीला आपण भाजून घेतलेला कांदा तो थोडासा टाकायचा आहे आणि परत एकदा त्यावर अर्धे काढून घेतलेले चिकन टाकून त्याची देखील एक पातळी तयार करायची आहे आणि उरलेला भात परत त्यावर टाकायचा आहे.

उरलेला भात टाकून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे मंद आचेवर या बिर्याणीला दम लावून घ्यायचा आहे. पाच मिनिटानंतर ही बिर्याणी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण घरबसल्या बिर्याणी तयार करू शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.