सध्या क’डक उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्याच्या या काळामध्ये आपल्याला खूपच गर्मी लागत असते. गरमीमुळे आपल्या शरीराचे तापमान हे आणखी वाढले जाते. या तापमानवाढीमुळे आपल्याला घाम देखील येत असतो घामामुळे शरीरामध्ये असलेले पाणी सर्व बाहेर जात असते त्यामुळे आपल्याला वेळोवेळी तहान लागली जाते. सहाजिकच आहे की शरीरामध्ये गर्मी वाटू लागली की आपण थंड पाणी पिऊ.
प्रत्येक व्यक्तीला उन्हाळ्यामध्ये गार थंड प्यावेसे वाटत असते. क’डक उन्हामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा तहान लागत असते. लोक जाऊन थेट फ्रीजचे दार उघडतात व थंड पाण्याची बाटली तोंडाला लावत असतात. परंतु अनेकदा थंड पाणी पिल्यामुळे घसा दुखीची समस्या निर्माण होत असते. थंड पाणी आपल्या शरीराला अनेक समस्या निर्माण करत असतात. अशावेळी आपल्या मनामध्ये हा विचार येतो की पाणी नेमके कोणते प्यायला हवे.
सध्याचा काळ हा को’वि’ड काळ असून या काळामध्ये आपल्याला वेळोवेळी गरम पाणी पिण्यास सांगितले जाते तसेच काढा देखील पिण्यास सांगितले जाते. अशावेळी आपल्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण होतो की आपण नेमके कुठले पाणी प्यायला हवे. फ्रिज मधले थंड पाणी कि माठातले मध्यम पाणी की थोडेसे कोमट पाणी. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबतची सर्व माहिती सांगणार आहोत.
वैज्ञानिकांचा असे मानणे आहे की उन्हाळ्यामध्ये फ्रिजचे पाणी दिल्यामुळे घशा संबंधीचे अनेक रोग निर्माण होऊ शकतात. खूपच जास्त थंड पाणी पिल्यामुळे गळ्यामध्ये असलेल्या कोशिकांचे तापमान अचानक कमी होते यामुळे घशामध्ये असलेल्या ग्रंथींना सूज येत असते. अशावेळी असे सांगितले जाते की फ्रिजमधले थंड पाणी शक्यतो पिऊ नये.
आता अनेक लोक कोमट पाणी पीत असतात. परंतु सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी पाणी पिले तर काही हरकत नाही परंतु, सतत कोमट पाणी पीत राहिलो किंवा तुम्हाला काहीही झालेले नसताना देखील तुम्ही कोमट पाणी पीत असाल तर यामुळे शरीराचे तापमान वाढले जाऊ शकते. यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात कोमट पाणी पिऊ नये. परंतु ज्या व्यक्तीला सं’सर्ग झाला आहे किंवा त्यासंबंधीच्या काही समस्या आहे तर अशा लोकांनी पाणी पिण्यास काही हरकत नाही.
आता प्रश्न पडतो की माठातले पाणी पिण्यास योग्य असते की नाही तर माठातले पाणी हे केवळ शरीराला थंडावा देत नाही तर आरोग्यासाठी देखील उत्तम मानले जाते. मातीच्या भांड्यामधे ठेवलेले पाण्याचे सेवन केल्यास शरीरासाठी फायदाच होत असतो. असे म्हटले जाते की माठातले पाणी पिल्यामुळे यामध्ये असलेल्या तत्त्वामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती आणखी वाढली जाते. हे पोटाला शीतलता पोचवण्याचे काम करत असते त्यामुळे पोटासंबंधी चे कुठलेही विकार असतील तर ते देखील नाहीसे होत असतात.
माठातल्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल उपलब्ध नसते. अशा वेळी जर तुम्ही दररोज केवळ माठातले पाणी सेवन करत असाल तर यामुळे मेटाबोलिजम देखील चांगले होत असते.जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.