फक्त चोवीस तासात लिव्हर होईल एकदम साफ.! शरीर आतून स्वच्छ करायचे असेल तर याहून सोपा उपाय नाही.!

आरोग्य

मित्रांनो, यकृत म्हणजेच लिव्हर आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्याने रक्त शुद्ध करणं आणि अन्न पचनास मदत होते. यातून तयार होणाऱ्या बाइल रसाने अन्न पचनाला मदत मिळते. यकृताचे कार्य कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि फॅट मॅनेज करणे हे असते. यकृत साफ नसेल तर तोंडाला वास येणे, पोट फुगणे, लघवी पिवळी होणे, डोळ्यांखाली काळे होणे असे अनेक लक्षणे आढळून येतात. यकृत निरोगी आणि साफ असेल तर आपले शरीर सुद्धा सुदृढ राहते.

पण आपल्या चुकीच्या सवयींमुळे जसे की, जास्त तळलेले पदार्थ खाणे, एक्सरसाइज न करणे, प्रमाणापेक्षा जास्त धुम्रपान करणे आणि मद्यसेवन करणे यांमुळे लिव्हरवर प्रभाव पडतो. जास्त दबाव पडल्याने लिव्हर योग्यप्रकारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही. यासाठी आज आपण एक उपाय बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे. दुधी, हळद, कोथिंबीर, लिंबू आणि मीठ.

दुधीची भाजी सर्वाना माहित असेलच. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक सारखे पोषक घटक आढळतात. आयुर्वेदानुसार दुधी पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. म्हणूनच दुधीचा अर्धा भाग घेऊन त्याचे तुकडे करून घ्या आणि मिक्सरला वाटून घ्या. हे वाटून घेतल्यावर त्याचा रस गाळून घ्या. हा रस एक ग्लास असला पाहिजे.

हे वाचा:   नखे वाढवून फॅशन मिरवणारे एकदा हे वाचा.! नखं वाढवणे शरीरासाठी आहे खूपच नुकसानदायक.! अनेकांच्या शरीराचे झाले आहे वाटोळे.!

यात एक चमचा हळद मिक्स करा. आणि चवीसाठी मीठ टाका. शक्यतो काळे मीठच वापरा. तसेच यात कोथिंबीर बारीक करून टाका. हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडेंट, अँटी- ट्यूमर, अँटी सेप्टिक, अँटी वायरल, कार्डियो प्रोटेक्टिव आणि किडनीसाठी पोषक असणारे औषधी गुणधर्म आहेत. हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते.

तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकते. कोथिंबीरीची खाल्ली असता अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणे, पोटात गुब्बारा धरणे, अल्सर, मूळव्याध आदी विकार होत नाहीत. हिरव्यागार कोथिंबीरमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि के मुबलक प्रमाणात आढळतात.

म्हणूनच पोटाच्या विकारांवर कोथिंबीर अतिशय फायदेशीर असते. हा रस सकाळी उपाशी पोटी घ्यावा. याचे सेवन केल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका. या उपायाने तुमचे यकृत साफ होईल. तसेच यकृतासाठी मनुकेसुद्धा खूप फायदेशीर आहेत. मनुक्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मनुके एनर्जी असलेलं एक लो फॅट फूड आहे.

हे वाचा:   या पानांचा असा करा उपयोग, शरीरा मध्ये एकही विषारी पदार्थ उरणार नाही; दहा दिवसांमध्ये वजन कमी होऊ लागेल.!

ज्यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. तसेच, यात अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे कँसर सारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत मिळते. हे पाण्यात भिजवले तर याचे फायदे अधिक वाढतात. म्हणूनच अर्धी वाटी मनुके रात्री पाण्यात भिजवून ठेवावे आणि हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून थोडे थोडे दिवसभर प्यावे.

या उपायाने तुमचे यकृतामधील घाण पूर्ण साफ होऊन जाईल. आणि शरीर निरोगी राहील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.