रोज-रोज होणाऱ्या पित्तावर याच्या पेक्षा सरळ सोपा उपाय नसेल.! ना कुठले औषध ना गोळी फक्त एकदा खायचे आणि पित्त विसरून जायचे.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, तुमच्या फायद्यासाठी ही माहिती तुम्ही एकदा संपूर्ण नक्की वाचा. आज-काल शोधूनही एकही व्यक्ती अशी सापडणार नाही की ज्याला बद्धकोष्ठतेचा त्रास नसेल किंवा पोटात गॅसची समस्या झाली नसेल. कारण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचा युगात आपल्यापैकी सर्वजण मसालेदार चमचमीत अन्न सेवन करतात. उलट-सुलट जड भोजन केल्याने आपल्या पोटाचे मात्र हाल होतात. पचनक्रिया बिघडते.

अति प्रमाणात तेलकट खाल्याने देखील पचनशक्ती कमजोर होते. याशिवाय तुमच्या शरीरातील फायबरचे प्रमाण कमी झाल्यास पचनासंबंधीच्या तक्रारी उद्भवतात. आहारामध्ये पुरेशा प्रमाणात हिरव्या व पालेभाज्या फळे यांचा अभाव असणे यामुळे पोट बिघडू शकते. रोज गरजेपेक्षा कमी पाणी पिणे हे देखील अनेक समस्यांना निमंत्रण देते.

त्यामुळे आपली चयापचय क्रिया सुरळीत होत नाही. आपले पचनशक्ती कशी वाढवावी? पोटामध्ये वारंवार गॅस होत असल्यास, तो गॅस कसा घालवावा. त्याबद्दल काही उपाय आज आपण पाहुयात. जर तुम्हाला कधीही गॅसची समस्या होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या भोजनामध्ये सॅलडचे प्रमाण आवश्यक तेवढे वाढवावे. अनेक जणांना नियमित सॅलेड खाण्याची सवयच नसते.

जुने लोक सांगतात एक घास बत्तीस वेळा चावून खावा. आपण तसे करत नाही. शक्य तितका घास जास्त वेळ चावून बारीक करूनच अन्न पोटात ढकलावे. आयुर्वेदानुसार, जेवताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी दहा मिनिटे आणि जेवणानंतर ४५ मिनिटे झाल्यावरच पाणी प्यावे. त्यामुळे तुमचा जठराग्नी मंद न पडता तेवत राहतो. तुमची पचनशक्ती वाढण्यास कोणताही उपाय न करता मदत होते.

हे वाचा:   कुठे ही दिसली ही पाने तर झटकन तोडून घ्या, याचे फायदे पाहून डॉक्टरही हैराण आहेत.!

याशिवाय नियमित 40 मिनिटे सलग चालल्यामुळे देखील पोट साफ होण्यास मदत होते. एक प्रकारे हा व्यायामच आहे. जेवल्यावर अनेक जण बडीशेप खातात किंवा अनेक हॉटेल्स आणि उपहारगृहामध्ये देखील बिल देताना बडीशोप सोबत देतात असे तुम्ही पाहिले असेल. परंतु या पद्धतीने उपाय करा जास्त फायदेशीर ठरेल. जेवल्यानंतर एक छोटा तुकडा गुळाचा खावा किंवा खडीसाखर मिक्स करून बडीशेप खावी, यामुळे पोटात गॅस होत नाही.

याशिवाय ओवा गॅस मिटवून पचनक्रिया सुरळीत करण्यास आपली मदत करतो. यासाठी जड आहार घेतल्यावर सैंधव मिठासोबत ओव्याचे सेवन करा व त्यानंतर कोमट पाणी प्या. तुमचा कोठा नेहमीच साफ राहील. आपले आजी आई सांगतात, पहाटे कोऱ्या चहा मध्ये एरंडेल तेल घेतल्याने पोट साफ होऊन कृमी जंत असतील तर त्याही जातात. लक्षात घ्या, पोट साफ असण एकंदरीत शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे वाचा:   अंथरुणात खिळलेला पळू लागेल.! जड पडलेले शरीर होईल एकदम मोकळे.! एका घोटात सगळे शरीर मोकळे होईल.!

त्याचा परिणाम तुमच्या त्वचा, केस, हाड सांधे या सर्व बाबींवर होत असतो. वेळोवेळी पोट साफ न झाल्यास तुमच्या शरीरात अकारण चरबी वाढून वजन वाढल्याने लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. लठ्ठपणामुळे डायबेटिस ब्लडप्रेशर सारख्या अनेक आजारांना निमंत्रण मिळते. बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करत राहिल्यास मुळव्याधी सारखे गंभीर आजार देखील होतात.

अन्न खावसे न वाटण, चिडचिडेपणा येणे परिणामी नैराश्य येणे यासारखे सहज दिसून न येणारे छुप्या व्याधी जडतात. तेव्हा दररोज पोट साफ ठेवून भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांना आपल्यापासून दूर ठेवा..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.