जसा ऋतू बदलला जातो तशा शरीरामध्ये विविध समस्या सुरू होत असतात. या समस्यांमध्ये ताप येणे, सर्दी, खोकला, पडसे, छातीत कफ इत्यादी प्रकारच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. अशावेळी आपण वेगवेगळे उपाय करून बघत असतो. परंतु आपल्याला त्याचा एवढा फायदा होत नाही.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा असा उपाय सांगणार आहोत. या उपायाद्वारे तुम्ही शरीराला मजबूत ठेऊ शकता. अनेक आजारांपासून शरीर नेहमी दूरच राहिल. जरी वरीलपैकी कोणत्याही समस्या तुम्हाला निर्माण झाल्या असतील, वरील पैकी कोणतेही आजार तुम्हाला सतावत असतील तरी देखील ते नष्ट होतील.
सर्दी खोकला झाल्यावर छातीत कफ निर्माण होत असतो. आशाप्रकरचा कफ झल्यावर आपण खूपच हैराण होऊन जात असतो. यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असतो सर्दी मुळे पूर्णपणे नाक बंद होत असते. कोंडलेले नाक खूपच त्रासदायक अनुभव देत असते. याबरोबरच पुन्हा पुन्हा नाकातून पाणी येत राहते.
खोकल्याचेही तसेच असते यामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते. साधारणतः खोकला हा चार ते पाच दिवसात बरा होत असतो परंतु जर तुम्हाला लगातार एक दोन आठवड्यापर्यंत खोकला असेल तर ही चिंतेची बाब आहे. यासाठी तुम्हाला हा उपाय खूपच फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग पाहूया कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय व याला कोणकोणत्या साधनसामग्रीची आवश्यकता भासेल तसेच याच्या सेवनाने किती फायदा होईल.
सर्वप्रथम गॅस वर एक पातेले ठेवून त्यात दोन ग्लास पाणी टाकावे. जेव्हा पाण्यातून उकळी येईल त्यावेळी एक इंचाचे अद्रक चांगल्याप्रकारे सोलून यामध्ये टाकावे. याव्यतरिक्त याला कुटून टाकावे. यामुळे छाती मधला कफ नष्ट होत असतो. त्यानंतर या पातेल्यामध्ये एक खाण्याचे पान बारीक बारीक तुकडे करून टाकावे. यामध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते.
त्यानंतर यामध्ये सात ते आठ काळीमिरी टाकावी. सर्दी खोकला झाल्यावर यासाठी काळीमिरी अतिशय उपयुक्त मानली जाते. लक्षात ठेवा काळीमिरी चांगल्या प्रकारे कुटून मगच यात टाकावी. त्यानंतर यामध्ये तीन ते चार तुळशीचे पाने टाकावीत. त्यानंतर यात एक लहानसा तुकडा टाकावा. त्यानंतर याचे सेवन करावे. असे एक दोन दिवस केले तर याचा फायदा तुम्हाला होत राहील.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.