हे एक फळ घरी घेऊन या.! जुन्यातला जुना गजकर्ण गायब करून टाकेल.! आठवड्यात सगळा गजकर्ण होईल गायब.!

आरोग्य

हल्ली वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळतो आहे. प्रत्येकाला वेग वेगळ्या समस्या त्रास देत आहे. या सगळ्या समस्या मधील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे अंगावर खाज येणे. हल्ली वातावरणात बदल झाल्यामुळे प्रत्येकाला गरमीचा त्रास होत आहे. अनेकांना घाम येण्याची समस्या उद्भवत आहे. जास्त घाम आल्याने घामाच्या धारा चालू असतात पण बहुतेक वेळा अंगावरील घाम सुकून जातो आणि त्यानंतर त्या प्रभावी जागेवर आपल्याला खाज सुटू लागते.

उन्हाळा सुरू झाल्याने अनेकांना घामोळ्या देखील येतात आणि या घामोळ्या आल्यावर देखील आपल्याला खूप खाज सुटू लागते. जर आपण या समस्येकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात आपल्याला खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अंगावर खाज सुटू लागल्यावर आपण बहुतेक वेळा मेडिकलमधून क्रीम आणतो परंतु क्रीम लावल्यानंतर सुद्धा तितक्या पुरता आपल्याला फरक जाणवतो आणि ही खाज पुन्हा सुरू होऊन जाते.

खाज आल्यावर आपले मन त्या प्रभावित जागेवर विचलित होत असते म्हणजेच की वारंवार ती जागा खाजावे असे आपल्याला वाटत असते परंतु आपण जसे केले तर नखांच्या इन्फेक्शनमुळे समस्या अजून वाढू शकते आणि परिणामी संपूर्ण शरीरभर तुम्हाला खाज येऊ शकते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.हा उपाय केल्याने तुमच्या शरीरावरील खाज व अन्य त्वचा विकार समस्या लवकरच दुर होणार आहे.

हे वाचा:   चार दिवस दुधासोबत घेऊन बघा शरीराचे रोग दुर पळू लागतील.! नसाची कमजोरी- दबलेली नस, गॅस, बद्धकोष्ठता कायमची होईल दूर...!

आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये वेगवेगळे पदार्थांचा उपयोग सांगण्यात आलेला आहे. आजच्या लेखामध्ये सुद्धा आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पदार्थाचा वापर करणार आहोत, त्या पदार्थाचे नाव आहे कारले. आपल्यापैकी अनेकांनी कारल्याची भाजी खाल्ली असेल. कारले हे चवीला कडू असतात परंतु कारलयाच्या अंगी अनेक औषधी गुणधर्म असतात म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कारले घ्यायचे आहे.

हे कारले आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची धूळ,विषारी घटक जमा झाले असतील तर ते निघून जाईल त्यानंतर कारले चे साल न काढता बारीक बारीक काप आपल्याला करायचे आहेत. आपल्याला कारले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडेसे पाणी मिक्स करून मध्यम स्वरूपामध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही पेस्ट बनवून झाल्यानंतर ज्या जागेवर खाज जास्त येते अशा जागेवर ही पेस्ट लावू शकतो.

असे काही दिवस केल्याने तुम्हाला त्वरित फरक जाणवू लागेल. आपल्या शरीरावरील खाज, खरुज ,नायटा दूर करण्यासाठी अजून एक उपाय देखील आपण करू शकतो, त्यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे. कापूर बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतो. कापूर च्या वड्या घेऊन त्याची बारीक पावडर आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर खोबरेल तेल घ्यायचे आहे.

हे वाचा:   घसा दुखी साठी याहून सोपा उपाय नाही.! घसा सुजू लागला तर पटकन करायचे हे एक काम.! या पाच गोष्टी घशाला नक्की आराम देतील.!

खोबरेल तेल आणि कापूर यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरावरील विषारी घटक दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता आपल्याला एक ते दोन चमचा खोबरेल तेल घेऊन कापूर पावडर मध्ये मिक्स करायचे आहे. जर शरीरावर जास्त प्रमाणात खाज सुटलेली आहे औषध उपचार करून सुद्धा खाज दूर होत नसेल तर अशा वेळी खोबरेल तेल व कापूर या मिश्रणामध्ये आपल्याला थोडीशी कारल्याची पेस्ट मिक्स करायची आहे आणि ज्या ठिकाणी खाज जास्त येते अशा ठिकाणी हे मिश्रण लावायचे आहे.

हे मिश्रण अर्धा तास तसेच ठेवू शकता. असे जर आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा केले तरी तुमच्या शरीरावरील संपूर्ण खाज,कोणताही त्वचा विकार मुळापासून नष्ट होऊन जाईल म्हणून हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *