आपण बाजारामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या वस्तू आणण्यासाठी जात असतो. वस्तू खरेदी करत असताना आपण नेहमी हे पाहून घेत असतो की या वस्तू चांगल्या आहेत की नाही. अशा वस्तूंची आपण सर्व बाजूंनी हाताळणी केल्याशिवाय घेत नाही. काही बंद पॉकेटमध्ये असलेल्या वस्तू आपण एक्सपायरी डेट बघितल्याशिवाय घेत नाही.
परंतु असे अनेक पदार्थ असतात ज्या वर एक्सपायरी डेट नेसते ना वरून ते आपल्याला पाहता येत असते. जसे की अंडी. अंडी खरेदी करण्यासाठी आपण गेलो तर आपल्याला काहीच समजू शकत नाही की हे अंडी किती जुने आहेत तसेच हे आत मधून खराब तर नाही ना. शिवाय यावर कुठल्याही प्रकारची एक्सपायरी डेट नसते. मग अशा वेळी नेमके काय करायला हवे.
आपण जी अंडी आणणार आहोत ती खराब आहे की नाही ही अंडी ताजी आहेत ना हे कशाप्रकारे तपासून घ्यायचे हे आजच्या या लेखामध्ये सांगणार आहोत. बाजारातून जेव्हा तुम्ही अंडी खरेदी करून घरी आणाल तेव्हा सर्वप्रथम आपण खाली दिलेल्या या टेस्ट नक्की करून पहा. जेणेकरून तुम्हाला समजेल की अंडी आत मधून गंधे किंवा खराब तर नाही ना.
सर्वात प्रथम एका वाटीमध्ये थोडेसे पाणी घ्यावे हे पाणी थंड असायला हवे. त्यानंतर तुम्ही आणलेल्या अंड्यापैकी एक अंड घेऊन हे न फोडता या पाण्यात टाकावे. जर हे थंड पाण्यामध्ये खाली गेले तर याचा अर्थ असा होतो की असे अंडे ताजे एकदम फ्रेश आहे. परंतु ते अंड काही वेळात थेट खाली जाऊन उभ्या आकाराने उभा राहात असते.
अशावेळी समजून जावे की असे अंडे बऱ्याच दिवसापासून चे आहे. म्हणजेच जुने आहे. याव्यतिरिक्त जरी अंडे हे पाण्यावर थोड्याफार प्रमाणात तरंगले तरी असे अंडे खराब नसते. परंतु हे अंडे थोडे फार जुने देखील असतात. आपल्या डोक्यामध्ये निर्माण होणारे हे विविध प्रश्न या टेस्टद्वारे सहजपणे दूर होतील.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.