सध्याचा काळ हा ऑनलाइन चा काळ आहे. सध्याच्या काळामध्ये सर्व गोष्टी ह्या ऑनलाइन झाल्या आहेत. अनेक वस्तू आपल्याला ऑनलाइन स्टोअरवर मिळत असतात. आता जेवण सुद्धा ऑनलाईन मिळू लागले आहे. अनेकदा ऑनलाइन द्वारे आलेल्या या वस्तूंमध्ये अनेक गैरप्रकार देखील पाहण्यास मिळत असतात.
असाच एक प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. या महिलेने आपल्या मुलाला भूक लागली म्हणून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बिर्याणी ऑर्डर केली होती. एका फूड ॲप च्या द्वारे तिने ही बिर्याणी ऑनलाईन केली होती. जेव्हा ही ऑर्डर या महिलेला मिळाली व या महिलेने पॅकेट उघडले तर ती हैराण होऊन गेली.
हा प्रकार घडलेल्या महिलेचे नाव आहे alique Perez या महिलेने फे’सबुक द्वारे ही सर्व माहिती शेअर केली आहे. तसेच असा इशारा देखील केला आहे की ऑनलाइन ऑर्डर केलेल्या खाण्यापिण्याच्या वस्तू पासून सावधान रहावे. या महिलेने काही फोटोज व काही व्हिडिओ शेअर केले आहे व त्यात सांगितले आहे की, मला फसवले गेले आहे.
तिने असे सांगितले आहे की माझ्या मुलाला भूक लागली म्हणून मी फ्राईड चिकन ऑर्डर केले होती, मात्र त्या जागी आम्हाला भलतच काहीतरी पाठवून देण्यात आलं होतं. त्या महिलेने सांगितले की फ्राईड चिकन च्या जागी आम्हाला फ्राईड टॉवेल पाठवला होता. जेव्हा आम्ही हे खाण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा सर्व प्रकार आमच्या लक्षात आला.
या महिलेने फे’सबुकवर ही सर्व माहिती दिली आहे. अनेक युजर्सनी संबंधित फूड कंपनीवर चांगलीच टीका देखील केली आहे. तुम्ही देखील जर ऑनलाईन अशाप्रकारे जेवण ऑर्डर करत असाल तर काळजी नक्की बाळगा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.