घामोळ्या शरीरभर आल्या असतील तर उन्हाळ्यात करायचे हे एक साधे सोपे काम.! एकपण घामोळी उरणार नाही.!

आरोग्य

उन्हाळ्यात त्वचा विकार होणे यात काही नवल नाही. त्यातल्या त्यात घामोळी म्हणजे प्रचंड आग त्रास. आता उन्हाळा चालू असल्यामुळे गरमीचे दिवस चालू असल्यामुळे आपला आपल्यापैकी अनेक जणांच्या अंगावर घामोळे येत असतात सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे गरमी मध्ये वेगवेगळे आजार त्वचेच्या आजारांचे प्रमाण वाढत असते.

त्यासाठी आपण अनेक प्रकारच्या पावडर चा वापर करत असतो किंवा अनेक प्रकारची औषधे देखील वापरत असतो. पण त्यासाठी कधी आपण कोणताही घरगुती उपाय वापरत नाही किंवा आपल्यापैकी अनेक जणांना हा घरगुती उपाय माहीत नसतो म्हणून आपण तो करत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की गरमीमध्ये घामोळे किंवा त्वचेच्या रोगांपासून आराम देण्यासाठीचे घरगुती उपाय.

चला तर मग जाणून घेऊया या आजच्या उपायासाठी कोण कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे अळशी वापरायची आहे. आता तुम्ही विचार करत असाल की अळशी ही खूप गरम असते आणि ती जर आपण गरमीमध्ये खाल्ली तर आपल्या शरीरामधील हिट म्हणजेच उष्णता अजून वाढवून आपल्या शरीराला अजून त्रास होऊ शकतो पण हा देखील एक योग्य प्रकार असतो.

हे वाचा:   आज जाणून घ्या कॅन्सर कसा होतो? हे काही अन्नपदार्थ आयुष्यात चुकून देखील खाऊ नये.! आरोग्याची काळजी असेल तर एकदा नक्की वाचा.!

जर तो प्रकार आपण व्यवस्थित रित्या वापरला तर मात्र आपल्याला अळशी कधीही त्रासदायक ठरणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला अळशी गॅस वर मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. आपण अळशी यासाठी भाजून घेणार आहोत जेणेकरून ती भाजल्यानंतर त्याची बारीक पूड तयार करून आपल्याला वापरता येईल. त्यानंतर मिक्सर च्या आधारे या आळशीचे बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे.

आता तयार करून घेतलेल्या अळशीच्या पावडरचा साठा करून देखील आपण ठेवू शकतो. दररोज सकाळी एक चमचा पावडर एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून आपल्याला दररोज प्यायचे आहे. असे केल्यामुळे आपल्या शरीरातील घामाचे प्रमाण कमी होईल आणि आपल्याला आलेले घामोळे देखील कमी होण्यास मदत होईल.

त्याच बरोबर एका ग्लास मध्ये एक चमचा अळशी पावडर आणि एक चमचा सैंधव मीठ टाकून मिक्स करून रोज सकाळी हे पाणी प्यायचे आहे. पण त्या आधी आपल्याला भाजून घेतलेले अळशी अशीच जाऊन खायचे आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर एक चमचा भाजलेली अळशी चावून खायची आहे आणि त्यानंतर हे बनवून घेतलेले पाणी प्यायचे आहे.

हे वाचा:   हिवाळ्यात सकाळी की संध्याकाळी केव्हा खावी उकडलेली अंडी, शरीराला कोणत्या वेळेत मिळत असतो जास्त फायदा.!

हे पाणी व ही क्रिया दररोज केल्याने आपल्या त्वचेवर येणारे घामोळे निघून जाईल त्याच बरोबर परत कधीही गरमीमुळे आपल्या अंगावर घामोळे येणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.