आपला कान हा एक नाजूक अवयव आहे हे सगळे जाणतात. पावसाळ्यात किंवा शेताच्या ठिकाणी किंवा मातीच्या ठिकाणी झोपल्यास आपल्या कानात कीड, मुंगी, गोन वैगरे प्राणी किंवा कीटक जाऊ शकतात. पण असे झाल्यास बऱ्याचदा काय करावे हे सुचत नाही. शिवाय कान चावत आहे असे जाणवत राहते. काहीवेळा चक्कर येणे, कान दुखणे, डोके दुखणे, झोप न लागणे असे त्रास देखील होताना दिसतात.
अशावेळी घरगुती आणि लगेच करता येणारे उपाय आज आपण पाहणार आहोत. अशा व्यक्तीची काळजी कशी घ्यावी, त्यावेळी काय करावे हे कळत नाही. जर अशी वेळ कोणावर आली तर कोणतीही गडबड करू नका. त्या व्यक्तीला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. कान चावत असल्याने कोणतीही काडी किंवा काहीही कानात घालून ते काढण्याचा प्रयत्न करू नका.
यामुळे तो किडा कानात आत जाण्याची शक्यता जास्त असते. तसेच कानात कोणत्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य घालू नका यामुळे कीडा कानातच मरण्याची शक्यता असते आणि यामुळे कानात इजा देखील होऊ शकते. चला तर बघूया, घरगुती उपाय. कानात कीडा गेल्यास सैधंव मीठ पाण्यात विरघळा आणि त्या पाण्याचे थेंब कानात घाला. यामुळे कानात गेलेला किडा किंवा गोम बाहेर येतात.
कानात किडा असल्यास त्या कानात मोहरीचे कोमट तेल घाला. ज्या व्यक्तीच्या कानात किडा गेला असेल तो कान सूर्यप्रकाशाकडे करा. सूर्यप्रकाश कानात गेल्याने कानात असलेला कीड बाहेर येईल. कारण कीडा किंवा गोम असते ते प्रकाशाकडे आकर्षित होतात. अशावेळी कानामध्ये थेंब थेंब कोमट पाणी टाका असे केल्याने किडा बाहेर यायला खूप मदत होते. कानात कोणता कीडा गेल्यास आपण तो बाहेर काढण्यासाठी खोबरेल तेलाचा ही वापर करू शकतो.
तसेच रुईची हिरवी पाने घेऊन ती गरम करा आणि त्याचा रस कानात टाका. यामुळे कानातील किडा बाहेर येईल. बऱ्याचवेळा ज्या कानात किडा गेला आहे त्या कानाच्या विरुद्ध बाजूने, कानावर मारल्यावर किडा बाहेर येण्यास मदत होते. पण असे करूनही किडा बाहेर येत नसेल तर तुम्ही ज्या कानात किडा गेलेला असेल त्या कानावर झोपला तरी किडा बाहेर पडायला मदत होते.
कान हा एक शरीराचा नाजूक भाग असल्याने जर उपाय करूनही कीड बाहेर पडत नसेल. तर लगेचच डॉक्टरांना दाखवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.