कडू कारले खाऊ वाटत नाही.? आहो असे बनवा, मोठे काय लहान मुले पण बोटे चाटून खातील.! कडूपणा नखभर पण उरणार नाही.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवडत असतील.कोणाला फळ भाज्या आवडत असतील, कोणाला फुल भाजी आवडत असते. या प्रकारच्या भाज्यांची आवड वेगवेगळ्या लोकांना असते तर आज आपण एक अशी भाजी पाहणार आहोत ज्यांची आवड जरा कमीच असते ते म्हणजे कारले. आज आपण एका वेगळ्या प्रकारचे कारले शिजवणार आहोत, म्हणजे तेच कारले आपण एका वेगळ्या प्रकारे शिजवणार आहोत त्यामुळे ते कारले कमी कडू लागणार आहे.

त्या उलट ते आपल्याला कितीतरी जास्त टेस्टी म्हणजेच चवदार लागणार आहे. सोबतच कारले खाणे हे आपल्या शरीरासाठी गुणकारी देखील असते. कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. कारल्यात असणाऱ्या अँटिऑक्सिडेंटमुळे कॅ’न्सर होण्यापासून रक्षण होते. कारले खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. चला तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि या कारल्याची भाजी आपल्याला कोणत्या प्रकारे बनवायचे आहे.

सर्वप्रथम आपल्याला कारली धुवून घ्यायची आहे. धूवून घेतल्यानंतर त्याचा पुढील आणि शेवटचा भाग कापून घ्यायचा आहे आणि कारल्यांना अशा प्रकारे कापायचे आहे जसे की आपण चिप्स साठी बटाटा कापतो म्हणजेच गोलाकार पद्धतीने कारल्याला कापून घ्यायचे आहे त्याचे छोटे छोटे गोलाकार तुकडे करून घ्यायचे आहे. या कारल्यांना जर मोठ्या मोठ्या बिया असतील तर त्या बिया देखील आपल्याला काढायचे आहे जेणेकरून त्यामुळे आपल्याला कडवटपणा येणार नाही.

हे वाचा:   सोन्याहूनही मौल्यवान आहे ही एक वनस्पती, जिथे दिसेल तिथून घेऊन या.!

त्यानंतर यामध्ये दोन लिंबाचा रस आणि एक चमचा मीठ टाकून कारल्यांना लावून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी ती काढली तशीच ठेवायची आहेत. पंधरा ते वीस मिनिटांनंतर कारले एकदम मऊ झालेले असेल आणि त्यामधील कडवटपणा देखील थोडा जास्त प्रमाणात निघून गेलेला असेल त्यानंतर त्यावर आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे. सर्वप्रथम आपल्या लाल तिखट टाकायचा आहे नंतर एक चमचा हळद राखायची आहे.

सोबतच एक चमचा बडीशेप पावडर टाकायची आहे, एक्सन साधना पावडर, एक चमचा गरम मसाला टाकून व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यावर दोन चमचे तेल टाकून व्यवस्थित कारली मिक्स करायचे आहेत. जेणेकरून आपण टाकलेले मसाले कारल्यांना लागतील. नंतर गॅसवर एक पात्र ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल टाकायचे आहे. आता या तेलामध्ये एक चमचा ओवा, एक चमचा जिरे आणि एक चमचा काळे तीळ टाकायचे आहेत.

त्यानंतर आपण मिक्स करून घेतलेले कारले आत मध्ये टाकायचे आहे. आणि कारले परतून घ्यायचे आहे. कारले व्यवस्थितरित्या परतून झाल्यानंतर त्या पात्रावर एक ताठ ठेवायचे आहे आणि त्या ताटावर थोडेसे पाणी ठेवायचे आहे आणि कारले वरती तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायचे आहेत जेणेकरून एक वेगळा स्वाद येण्यास मदत होईल. आता दोन दोन मिनिटांनंतर आपल्याला कारले मध्ये मध्ये परतून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला कळेल की कारले शिजत आहे की नाही.

हे वाचा:   एक तुरटीचा खडा असा वापरायचा गजकर्ण होईल गायब.! खाज, खरूज, गजकर्ण कायमचे होईल नष्ट.! त्वचा विकाराने त्रस्त लोकांनी नक्की वाचावे.!

मंद आचेवर पाच ते सात मिनिटे ही कारल्याची भाजी शिजवून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्याआधी एकदा पडताळून पाहायचे आहे की कारले शिजले आहे की नाही. जर कारले हे फ्रेश असेल म्हणजेच नवीन असेल तर ते लगेच शिजले पण जर हे कारले जून असेल तर त्याला शिजायला वेळ लागेल म्हणून त्यामध्ये थोडेसे पाणी तुम्ही टाकु शकता.

आता तयार झालेली भाजी चपाती भाकरी किंवा अशीच देखील तुम्ही खाऊ शकता पण त्याचा आस्वाद घेऊ शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.