वजन वाढवायचे असेल तर याहून सोपा उपाय नाही, दुबळ्या पतल्या लोकांसाठी आहे हे अमृता समान, आठवड्याभरातच वजन भरभर वाढले जाईल.!

आरोग्य

आपले शरीर धष्टपुष्ट व सुडोल असावे असे सगळ्यांनाच वाटते. आपले शरीर निरोगी व बळकट असले तर आपण सगळ्यात वेगळे व आकर्षक दिसतो. शरीर सुडोल बनविण्यासाठी अनेक जण मेडिकल स्टोर मधले अनेक उत्पादनांचा वापर करतात. मात्र या पदार्थांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि तुम्ही सुद्धा सुडोल व बळकट शरीराची स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठीच आज आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत.

या लेखात दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्यासाठी आम्ही असे नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत जो तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करेल. हे उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. केळं हे एक स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त फळ आहे. दररोज केळी खाण्याचे फायदे आरोग्यावर नक्कीच चांगले होतात. केळ्यामध्ये पोटॅशियम, विटामीन, फायबर्स, कार्बोहायड्रेट आणि जीवनसत्व क असते केळ्याची चव गोडसर आंबट असते.

ज्यामुळे लहान मुलांनाही केळी खूप आवडतात. शिवाय केळं सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारं फळ आहे. केळीमध्ये पुरेसे पोषकतत्त्व असल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम पटकन दिसून येतात. केळीमध्ये पोटॅशिअम असल्यामुळे उपाशीपोटी एक केळं खाल्यास तुम्हाला त्वरीत एनर्जी मिळते. केळं खाण्याचा शरीरावर तर चांगला परिणाम होतोच शिवाय त्यामुळे त्वचेचंही आरोग्य सुधारतं.

हे वाचा:   रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर चहामध्ये मिसळा फक्त या २ गोष्टी.!

केळ्यामुळे तुमचे वजन भरपूर वाढते अशी एक समज आहे. जर तुम्ही बरीक प्रकृतीचे असाल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही केळं खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर दररोज एक केळं खाण्यासही काहीच हरकत नाही. एकतर केळं खाण्यामुळे तु्म्हाला सतत भुक लागणार नाही आणि खालेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होईल. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

केळ्यामधील पोषक तत्त्वांचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो. केळ्यातील घटकांमुळे तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि चांगला परिणाम तुमच्या किडनीच्या कार्यावर होतो. केळ्यात पोटॅशिअम हे विघटनशील असल्यामुळे तुमची किडनी अथवा मू’त्रपिंड यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. ज्यांना मू’त्रपिंडाचे विकार आहेत त्यांच्यावर केळं खाण्याचा प्रयोग केल्यामुळे चांगला फरक जाणवल्याचे अनेक संशोधनात आढळून आलेले आहे.

त्यामुळे मू’त्रपिंडाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी दररोज एक केळं खाणं नक्कीच फायद्याचं ठरू शकते. सोबतच तुम्ही दररोज एक ग्लास दूध घेऊ शकता. दुधाच्या सेवनाने देखील तुमचे वजन वाढू लागेल व तुमची तब्येत सुधारेल. दुधामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असते आणि या मुळेच तुमची हादे व स्नायू देखील बळकट बनतात. शाबुदाणे देखील तुम्हाला तुमची तब्येत सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

हे वाचा:   या आयुर्वेदिक काढ्याने घसा, खोकला आणि सर्दी बरा करुन रोगप्रतिकार शक्ती सुधारते; रोगांशी लढण्याची ताकद प्रचंड वाढेल.!

या मध्ये मोठ्या मुबलक प्रमाणात आयरन व विविध घटक मग्नेशीयम व फोस्फेट असते. यांचे नियमित सेवन केल्यास तुमच्या शरीरातील दुर्बलता कमी होईल व शरीरात ऊर्जा निर्माण होवू लागेल. अशांती, अनीद्रा व तणाव असेल तर रात्री झोपताना शाबुदाणा व दूध यांचे मिश्रण करुन नक्की खा यामुळे तुमच्या समस्या नक्कीच कमी होतील. तसेच मनुके पाण्यात भिजवून मग खाणे देखील तुमचे वजन वाढवण्यास खूप मदत करेल.

मनुके हे कॅल्शियम व विटामीन यांनी भरलेले असतात. यांच्या सेवनाने तुमचे वजन तर वाढेलच मात्र पचन तंत्र देखील नियमित कार्यरत होईल. अन्न नीट प्रकारे पचन होण्यास मनुके मदत करतात. आम्लपित्ताचा जर त्रास वारंवार जाणवत असेल तर सुके मनुके खा याने तुम्हाला नक्की आराम जाणवेल. या दिलेल्या पदार्थांचे सेवन नियमित करुन तुम्ही तुमचे शरीर सुंदर व धष्टपुष्ट बनवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.