चमचाभर खोबऱ्याचे तेल करेल जादू, फंगल इन्फेक्शन चा नायटा पाच दिवसात होईल गायब, असा उपाय कधी करून तरी बघा.!

आरोग्य

त्वचाविकारात बद्दल बोलले गेले तर फंगल इन्फेक्शन हा त्वचाविकार सर्वात जास्त बघितला जातो. अनेकांना फंगल इन्फेक्शन चा त्रास सतावत असतो. अतिशय भयंकर अशी खाज व यामुळे होणारा त्रास हा आपल्याला सहन सुद्धा होत नाही. अशा वेळी आपण यावर वेगवेगळे उपाय करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपल्याला याचा फायदा काही होत नाही.

यासाठी बाजारामध्ये वेगवेगळी औषधे देखील मिळतात. परंतु यामुळे फंगल इन्फेक्शन जात नाही. फंगल इन्फेक्शन हे जास्त करून जांघेमध्ये येत असते. याला मराठीमध्ये गजकर्ण, खरूज, नायटा असेदेखील म्हटले जाते. यामुळे त्वचेवर गोलाकार लाल रंगाचा डाग निर्माण होतो. कधी कधी यातून इतकी भयंकर खाज येत असते की व्यक्ती यावर नियंत्रण सुद्धा ठेऊ शकत नाही.

खाज जास्त आल्यामुळे अनेकदा यातून रक्त देखील येत असते. अशा वेळी तेथे जखम होण्याची देखील संभाव्यता असते. यापासून वाचण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही सोपे असे रामबाण घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय केल्याने तुम्हाला फंगल इन्फेक्शन पासून कायमची सुटका मिळेल. तुम्हाला फक्त हे काही उपाय सांगितल्याप्रमाणे करायचे आहेत.

हे वाचा:   ही एक गोष्ट ज्याला समजते आणि जमते त्याचे पोट आयुष्यात कधीच खराब होत नाही.! दररोज पोट साफ ठेवायचे असेल तर हे एक काम रोज करा.!

चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय जे तुमचे फंगल इन्फेक्शन कायमचे दूर करेल. यासाठी लसुन व नारळाचे तेल अतिशय उपयुक्त मानले गेले आहे. हा उपाय अतिशय रामबाण असून आयुर्वेदिक देखील आहे. या उपायांमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड-इफेक्ट देखील दिसणार नाहीत. आपल्याला या उपायासाठी फक्त दोन ते तीन पाकळ्या लसूण व एक चमचा नारळाचे तेल लागेल.

सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या चांगल्याप्रकारे सोलून घ्याव्या व याला खलबत्त्या च्या साह्याने कुटून घ्यावे. यामध्ये एक चमचाभर नारळाचे तेल टाकून त्याला पंधरा मिनिटांसाठी ढवळत राहावे. बनलेली ही पेस्ट ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले आहे त्या ठिकाणी लावावी हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. सकाळी अंघोळीपूर्वी याला हाताने स्वच्छ धुऊन काढावे.

हे वाचा:   हे पीठ चेहऱ्यावर असे लावा चेहऱ्यावरचे डाग होतील छूमंतर, सुंदर दिसण्याचे आहे हा राज.!

असे जर तुम्ही काही दिवस करत राहिलात तर तुम्हाला तुमच्या फंगल इन्फेक्शन बरा झालेला दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *