एक अंड तुमचे केस सिल्की बनवू शकते, फक्त त्याचा योग्य असा उपयोग करता यायला हवा.!

आरोग्य

जर तुम्हाला तुमचे केस काळेभोर, मुलायम बनवायचे असेल तर हा लेख केवळ तुमच्या साठीच आहे. आजकाल प्रत्येकाला सुंदर दिसावे असे वाटत असते. यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे उपाय देखील करून बघत असतो. परंतु काही वेळा आपल्याला योग्य तो उपाय माहिती नसल्यामुळे केसा संबंधीच्या अनेक समस्या उद्भवलेल्या दिसत असतात.

अनेक लोक सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेले सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. त्याचप्रमाणे केसांसाठी देखील काही प्रॉडक्ट आहेत त्यांचा वापर करून देखील केसांना सुंदर मुलायम बनवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आपल्या घरांमध्ये देखील असे काही पदार्थ असतात ज्यांच्या वापराद्वारे आपण सहजपणे आपल्या केसांना सुंदर सिल्की बनवू शकतो.

अंड्याचे सेवन तर प्रत्येक जण करत असेल आणि आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाची व फायदेशीर मानली जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की अंड्या द्वारे तुम्ही तुमच्या केसांना देखील मुलायम सिल्की बनवू शकता. अंडी केसांसाठी खूपच चांगली मानली जातात. कारण केसांसाठी अंड्याचा वापर केला तर यामुळे केस हे प्राकृतिक स्वरूपात मॉइस्चराइजर होत असतात.

हे वाचा:   पोटात साठलेली सगळी घाण बर्फासारखी वितळून बाहेर निघेल.! पोट होईल एकदम चकाचक साफ.!

हेल्थ एक्सपर्ट द्वारे असे सांगितले जाते की प्रोटीन आणि बायोटीन असल्यामुळे अंडी खराब झालेले केस चांगले करू शकते. तुम्हाला फक्त आणण्याचा योग्य असा उपयोग करता यायला हवा. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत. कशा प्रकारे तुम्ही अंडी केसांना लावू शकता. व याचा किती फायदा तुम्हाला होईल हे आपण सविस्तरपणे पाहूया.

केसांसाठी अंड्याचा मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एलोवेरा लागणार आहे. तसेच यासाठी ऑलिव्ह ऑईल देखील लागणार आहे. एलोवेरा केसांना आणखी स्ट्रॉंग बनवत असतो. तसेच ऑलिव्ह ऑइल बरोबर याचे मिश्रन करून लावल्यास केसांना भरपूर असा फायदा होत असतो. अंड्याचा उपयोग कसा करायचा आहे हे आपण पाहूया.

सर्वप्रथम एका मोठ्या वाटीमध्ये दोन ते तीन मोठे चमचे अंडे फोडून घ्यावे. त्यानंतर यामध्ये चार ते पाच चमचे एलोवेरा जेल टाकावे त्यानंतर यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल टाकावे व याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. याला 30 मिनिटांपर्यंत ठेवून द्यावे. त्यानंतर हे केसांना लावून थंड पाण्याने धुऊन टाकावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   बस या पानात ही एक वस्तू घालून खा आणि मिळवा या 17 आजारातून तुरंत आराम... इतके फायदेशीर आहेत या वनस्पतीचे पानं..!

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *