अनेक लोक चिकन, अंडी मासे इत्यादींचा समावेश आपल्या आहारात करत असतात. यामुळे आपल्याला भरपूर असा फायदा देखील होत असतो. चिकन मध्ये तसेच माशांमध्ये असे अनेक उपयुक्त गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी फारच फायदेशीर मानले जातात. परंतु अनेक लोक चिकन मटण अंडी खातात परंतु माशाचे सेवन करत नाही. परंतु असे लोक खूपच मोठी चुकी करत असतात.
माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऑईल असते. आहारात ओमेगा -3 तेलांचा अभाव एखाद्या व्यक्तीचे आयुष्य लहान करू शकते. सि’गारेट ओढण्यापेक्षा हे धोकादायक असू शकते. असा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. अनेकांना याबाबत माहिती नसेल परंतु मासे हे ओमेगा -3 चा चांगला स्रोत मानला जातो. तज्ञांनी असे सुचविले आहे की लोकांनी नियमितपणे त्यांच्या आहारात ओमेगा 3 समाविष्ट करावा.
या अभ्यासामध्ये संशोधकांना असे आढळले आहे की धू’म्रपान केल्याने एखाद्या व्यक्तीचे संभाव्य आयुष्यमान चार वर्षांपर्यंत कमी होते. तर साल्मन आणि मैकेरेल हे फॅटी ऑईल आढळणार्या माशांच्या सेवन न केल्यामुळे एखाद्याचे आयुष्यमान पाच वर्षांपर्यंत कमी होऊ शकते.
अनेकांना माहिती नसेल परंतु फिश ऑइल हृदयासाठी खूप चांगले मानले जाते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होणाऱ्या समस्येपासूनही दिलासा मिळत असतो. यासंदर्भात तज्ञ असे म्हणतात की आहारात 8 टक्के किंवा त्याहून अधिक ओमेगा 3 आरोग्यासाठी चांगले आहे. त्याची निर्देशांक पातळी चारच्या खाली नसावी.
फॅटी अँसिडस् रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर आणि अभ्यासाचे सह-लेखक डॉ. बिल हॅरिस यांच्या मते, फॅटी अँसिडस् विषयी येथे पुरविलेली माहिती ही तितकीच महत्वाची आहे जी रक्तदाब, धूम्रपान आणि मधुमेहाच्या एकूण मृ’त्यूच्या संबंधांइतकीच उपयुक्त आहे. 2,500 लोकांवरील 2018 च्या अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळले की ज्या लोकांनी ओमेगा -3 चे जास्त प्रमाणात सेवन केले त्यांचा मृत्यूचा धोका 33 टक्के कमी होता.
महिलांवर आधारित अभ्यासात देखील असेच परिणाम दिसून आले आहेत. या व्यतिरिक्त जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत अशा लोकांनी सोयाबीन तसेच अक्रोड चे सेवन करायला हवे यामध्ये देखील ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात आढळत असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.