हा दोन मिनिटाचा नाष्टा सर्वांना खुश करून टाकेल.! यात मुरमुरे असे वापरा, खाणारे खातच राहतील.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यावर वेगवेगळ्या पदार्थांचे नाष्टा करत असतात. आपल्यापैकी अनेकांना नाष्टा सेवन करणे आवडत असतो. काही जण नाश्ता करत नाही परंतु काही जण सकाळी आवर्जून वेगवेगळे पदार्थ बनवून तसे पाहायला गेले तर सकाळी उठल्यावर नाश्ता करणे हे आपल्या शरीरासाठी चांगले असते.आपल्याला दिवसभर काम करायचे असते आणि अशावेळी आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा हवी असते.

जर आपण सकाळी उठून नाश्ता केला तर आपल्या शरीरात दिवसभर ऊर्जा राहते, त्याचबरोबर आपल्याला भूक देखील लवकर लागत नाही. भूक लवकर न लागल्यामुळे आपले संपूर्ण मन आपल्या कामामध्ये लागते परंतु आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यावर नाश्ता करत नाही. अशावेळी आपल्याला वारंवार भूक लागते. वेळेवर जेवण न केल्यामुळे ऍसिडिटी, अपचन, गॅस यासारख्या समस्या देखील उद्भवतात तसेच आपल्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना औषधे घ्यायची असतात.

अशा वेळी घरातील गृहिणी मंडळी आवर्जून नाश्ता करत असतात. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत.ही रेसिपी जर तुम्ही केली तर अगदी उडुपी सारखा व हॉटेल सारखा नाष्टा घरच्या घरी तयार होणार आहे. त्याचबरोबर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात आणि म्हणूनच अगदी कमी वेळेमध्ये आणि चविष्ट नाश्ता आज तयार होणार आहे.

हे वाचा:   तीन खारकांनी केली कमाल.! कितीही गुडघे दुखी झाली तरी चिंता करू नका.! एका आठवड्यात सर्व काही ठीक करेल हा साधा सोपा उपाय.!

चला तर मग जाणून घ्या नेमकी कोणती आहे त्याबद्दल. आजची रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला एक ते दोन कप कुरमुरे लागणार आहेत. कुरमुरे आपण अनेकदा नाश्त्यामध्ये सहजता खात असतो आणि म्हणूनच एक ते दोन वाटी कुरमुरे आपल्याला मिक्‍सरच्या साहाय्याने बारीक वाटून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक वाटी आपल्याला रवा लागणार आहे.

आता आपल्याला एक वाटी दही लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ देखील घ्यायचे आहे. आता आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचे आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिटांसाठी हे मिश्रण व्यवस्थित मुरण्यासाठी ठेवायचे आहे. आता आपल्याला बन डोसा साठी चटणी देखील बनवायचे आहे त्यासाठी आपल्याला पा मद्ये थोडे तेल, मोहरी, लसूण, मिरची आणि कडीपत्ता, मुगाची डाळ टाकायची आहे आणि मंद आचेवर थोडा वेळ द्यायचा आहे.

त्यानंतर आपल्याला एका मिस्कर च्या भांड्यामध्ये मिरची, मीठ, लसूण आणि कोथिंबीर हे सारे मिश्रण एकजीव करून त्याची चांगली पेस्ट बनवायची आहे, आता आपण ही पेस्ट बनवली आहे त्यामध्ये आपल्याला तडका मिक्स करायचा आहे. पाच ते दहा मिनिटानंतर आपण जे पीठ मुरायला ठेवलेले होते त्या पिठामध्ये आपल्याला थोडेसे मिश्रण मिक्स करायचे आहे त्यासाठी आपल्याला पातेला मध्ये थोडेसे तेल, मूग डाळ, कडीपत्ता, मोहरी मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण मंद आचेवर गरम करून आपण जे मिश्रण तयार केले होते त्यामध्ये मिक्स करायचे आहे.

हे वाचा:   असा उपाय तुम्ही कधी ऐकला सुद्धा नसेल, झटपट चरबी कमी, पोटातला गॅस शून्य मिनिटात बाहेर.!

हे सारे मिश्रण एकजीव करायचे आहे आता आपल्याला गॅस वर एक तवा ठेवून त्यावर थोडेसे तेल टाकायचे आहे आणि तेल थोडे गरम होऊ द्यायचे आहे आणि चमचाच्या सहाय्याने आपण जे मिश्रण तयार केलेले आहे ते तव्यावर टाकायचे आहे आणि त्यानंतर एक ते दीड मिनिटे झाकण ठेवायचे आहे असे केल्याने तुमचा बन डोसा सहज तयार होईल, अशाप्रकारे ही रेसिपी जर तुम्ही फॉलो केली तर घरच्या घरी अगदी हॉटेल सारखा बन डोसा तुम्ही तयार करू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *